आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Deepali Syed,latest News In Divya Matahi

आम आदमी माझ्याच बरोबर, उमेदवार दीपाली सय्यद यांचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर मतदारसंघातील समोरच्या दोन्ही उमेदवारांकडे मोठी ताकद असली, तरी आम आदमी माझ्याचबरोबर आहे, असे आम आदमी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दीपाली प्रथमच नगरमध्ये आल्या. नगर जिल्ह्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. आम आदमीच्या नगरच्या पदाधिकार्‍यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली. सुरूवातीला राजकारणात येण्याचा विचार नव्हता. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरले, समस्या जवळून पाहिल्या. त्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
राजकारण सोपे नाही, परंतु आता हा विडा उचलला असून मागे हटणार नसल्याचे दीपाली यांनी स्पष्ट केले. भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार सर्वच बाबतीत ताकदवान आहेत. पण आम आदमी बरोबर असल्याने मी त्यांना टक्कर देणार आहे. महिलांच्या प्रश्नाची मला जाण आहे. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या सिध्दांतानुसार मी लढेन. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेणार आहे, असेही दीपाली यांनी सांगितले.
नागरिकांना बदल हवा आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन मी नागरिकांना करणार आहे. सर्वसामान्य घरातून आल्याने जनता माझ्याबरोबर राहील, असा विश्वास दीपाली यांनी व्यक्त केला.