आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या सहा हजार मतदार कार्डांना आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - निवडणुकीत होणारे बोगस मतदान टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला अाहे. नगर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात अवघी सहा हजार मतदान अोळखपत्रे आधार कार्डशी लिंकिंग झाली आहेत. येत्या तीन महिन्यांत उर्वरित तब्बल ३२ लाख मतदान कार्डे आधार कार्डशी लिंक करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होते. ते टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बोगस मतदान कमी करण्यासाठी आयोगाने प्रत्येक नागरिकाचे मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम निवडणूक शाखेने नियुक्त केलेले केंद्रस्तरीय अधिकारी करणार असून, ही प्रक्रिया मार्चपासून सुरू झाली आहे. केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करणार आहेत. त्याचबरोबर संबंधित मतदाराचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीही घेणार आहेत.
मार्च ते ३१ जुलै या कालावधीत हे काम चालणार आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने हजार ५६७ केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलआे) नियुक्त केले आहेत. मतदार आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आयोगाने ऑनलाइन सुविधादेखील सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) या संकेतस्थळावर मतदारांना आपले आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करता येईल. त्याचबरोबर आयोगाने लिंकिंगसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही सुरू केला अाहे. ५१९६९ या क्रमांकावर एसएमस सुविधाही सुरू केली आहे.

जुलैपर्यंत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी विशेष मोहिमेंतर्गत निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदार आेळखपत्र आधार कार्डशी लिंक करता येईल. मार्च ते २२ एप्रिलपर्यंत नगर जिल्ह्यात केवळ हजार मतदारांची आेळखपत्रे आधार कार्डशी लिंक झाली आहेत. येत्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ३२ लाख मतदार अोळखपत्रे आधार कार्डशी लिंक करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळण्यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे.
काम १००% पूर्ण करणार

^केंद्रीयिनवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नगर जिल्ह्यात छायाचित्र मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्याचे काम मार्चपासून सुरू झाले आहे. हे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न अाहे. जे बीएलआे हे काम शंभर टक्के पूर्ण करतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक गावातील विविध सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, विविध शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था युवकांनी सहभागी व्हावे. तसे झाल्यास हे काम वेगाने दिलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकेल.'' सुनीलमाळी, उपनिवडणूक अधिकारी, नगर.