नगर- नगर शहर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शनिवारी (4 ऑक्टोबर)दुपारी साडेबारा वाजता नेता सुभाष चौकात सभा होणार आहे.
पोलिस प्रशासनाने परवानगी दिली, तर युवा सेनेचे प्रमुख ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळीवाडा बसस्थानक ते नेता सुभाष चौकापर्यंत प्रचार रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक विक्रम राठोड यांनी गुरुवारी दिली. नगरसेवक राठोड म्हणाले, युवा सेनेने शिवसेनेना स्पष्ट बहुमत मिळणसाठी "मिशन १५० प्लस' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. राठोड यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांचे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आगमन होईल.पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे, असे राठोड यांनी सांगितले. यावेळी युवा सेनेचे शहर अिधकारी ऋषभ भंडारी, उपशहर अधिकारी दीपक कावळे, अभिजित गोल्हार, अंकुश चोपडा, संकेत खडामकर आदी उपस्थित होते.