आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात चार आदिवासींचा आत्मदहनाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- निळवंडे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात टाकळी येथे मिळालेल्या पर्यायी जमिनीवरील मालकी हक्क टाकळी ग्रामपंचायतीकडून नाकारण्यात आल्याने प्रकाश सोमा पथवे, सोमा सहादू पथवे, अशोक नाना पथवे, रामजी विठोबा पथवे या आदिवासींनी गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या आदिवासींना पोलिसांनी अटकाव केल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. टाकळी ग्रामपंचायतीने आम्हाला निळवंड्याच्या पुनर्वसनात मिळालेल्या पर्यायी जमिनीवरील हक्क नाकारून तेथे स्मशानभूमीचे बांधकाम चालवले आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तहसीलदार पोलिस आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय अन्य मार्ग उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश पथवे यांनी दिली.