आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adivasi Sahitya Sammelan Chairmanship Goes To Nagar

आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नगरकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महाराष्ट्र शाखा आदिवासी साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे दहाव्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नगर येथील साहित्य भाषा लोकसाहित्याच्या संशोधक डॉ. माहेश्वरी गावित भूषवणार आहेत, अशी माहिती माजी अादिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली.

संमेलनाचे उद््घाटन आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सावरा, स्वागताध्यक्ष मधुकर पिचड, प्रमुख अतिथी खासदार अशोक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. दोन चालणाऱ्या संमेलनात तीन परिसंवाद, कविसंमेलने, कथाकथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथयात्रा सांस्कृतिक जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अकरा वाजता ग्रंथप्रदर्शन विविध कलादालनांचे उदघाटन होणार आहे. उदघाटनाचा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेत पहिला परिसंवाद होणार आहे. आदिवासींच्या सांस्कृतिक संवैधानिकावर होणारे आक्रमण, अादिवासींपुढील आव्हाने-युवक महिलांचा सहभाग यावर परिसंवाद होईल. या परिसंवादात दशरथ माडावी भूमिका मांडतील.

कोण आहेत डॉ. माहेश्वरी गावित
डॉ.माहेश्वरी गावित या पेमराज सारडा महाविद्यालयात मराठी विषयाच्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एक शोध (लोकसाहित्य, सांस्कृतिक पार्श्वभूमी बोलीभाषा यांच्या संदर्भासह) पुणे विद्यापीठांतर्गत पीएच.डी. घेतली आहे. त्या बालभारतीच्या उपसंपादक मंडळात सदस्य आहेत. त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय आदिवासी समाजभूषण, विशेष अभ्यासक, गुणिजन गौरव आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.