आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिवासी मुलांच्या शिक्षणावर टाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शून्य ते दहा विद्यार्थी पटसंख्या असलेल्या आदिवासी भागांतील 24 शाळांवर शिक्षण विभागाकडून बंदीची कुर्‍हाड उगारली जाणार आहे. या सर्व शाळा द्विशिक्षकी असून यातील 22 शाळा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. बारी (माची) येथील शाळा यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. माळीझाप (अकोले) येथील विवेकवर्धिनी विद्यालयाचा समावेशही बंद होणार्‍या शाळांमध्ये आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील 212 विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे.

5 ते 10 पटसंख्येच्या शाळा सुरू ठेवताना शिक्षकांच्या पगारावर महिन्याकाठी किमान 50 हजार रुपये शासनाला खर्च करावा लागतो. विद्यार्थीसंख्येचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांवर महिन्याकाठी 5 ते 10 हजार रुपये शासनाला सोसावे लागत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. एज्यूकेशन सायकल केवळ आरटीई 2009 च्या कायद्याच्या निकषानुसार शिक्षकांची पदे किती निश्चित होतात किंवा किती पदे अतिरिक्त होतात. या प्रायोगिक माहितीच्या संकलनातून हे विदारक सत्य शिक्षण विभागासमोर आल्याने दहाच्या आतील पटसंख्येच्या द्विशिक्षकी शाळा तातडीने बंद करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

अकोल्याच्या माळीझाप उपनगरातील विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेत इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग आहेत. मात्र, प्राथमिक शाळेचा दर्जा असलेल्या आठवीच्या वर्गात अवघे दहा विद्यार्थी शिकत आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता, या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत शिक्षण दिले जाणार असून त्यासाठी प्रवासभत्ता खर्च दिला जाणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या सर्व शाळा वाड्या-वस्त्यांवर असून तेथे एसटी जात नाही. अन्य वाहनांची सुविधा पालकांना परवडणार नाही.

पहिली ते पाचवीतील विद्यार्थी एसटी किंवा जीपचा रोजचा प्रवास करून शाळेत नियमित हजेरी लावणे शक्य नाही. अल्पवयीन बालकांना एसटी किंवा तत्सम वाहनात बसून प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे या बालकांचे शिक्षण बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. शाळा बंद करण्यापूर्वी या मुलांची योग्य सोय करण्याची मागणी पालकवर्ग व गावकर्‍यांकडून होत आहे.
शाळा बंद करताना विद्यार्थ्यांची काळजी घेणार
एज्युकेशन सायकलनुसार प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी किंवा पहिली ते आठवीपर्यंत समजली जाते. आरटीई निकषानुसार पाचवी ते आठवीचा वर्ग जोडल्यास शिक्षक व अंशकालीन शिक्षकांची गरज किंवा पाचवी ते आठवीचा वर्ग जोडल्यास किती शिक्षक अतिरिक्त होतात याचे सर्वेक्षण करण्यात आले. अकोल्यात 30 सप्टेंबर 2011 च्या अहवालानुसार शून्य ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या 24 शाळा आढळून आल्या. या शाळा बंद करताना त्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.’’ मुश्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी, अकोले.