आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. रंजना गवांदें- बारचे उद्घाटन करून जनतेचा अपमान केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, म्हणून जिल्हा व्यसनमुक्ती अभियान प्रयत्न करत असताना गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी एका बिअरबारचे उद्घाटन करून जनतेच्या भावनांचा अपमान केला आहे, असा आरोप नगर जिल्हा व्यसनमुक्ती अभियानाच्या अॅड. रंजना गवांदे यांनी केला.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ६०० हून अधिक ग्रामसभांमध्ये जिल्ह्यात दारुबंदी करावी, असे ठराव मंजूर झाले आहेत. उर्वरित गावांत असे ठराव होऊ सुमारे एक हजार गावांत दारुबंदीची मागणी केली जात आहे. तथापि, जनतेची इच्छा विचारात घेता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी बारचे उद्घाटन करून जनतेच्या भावनेचा अपमान केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आंदोलनासाठी तेथील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत आहेत. मात्र, नगरचे गृहराज्यमंत्री राम शिंदे आमची परमिट रुमच्या उद्घाटनासाठी गेले हे अतिशय निंदनीय आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. हेरंब कुलकर्णी, बाळासाहेब मालुंजकर, सुखदेव ईल्हे, भाऊसाहेब येवले, विठ्ठल बुलबुले, बापू जोशी, दिलीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
बहुतांशी बिअर बार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे: गर्जे
हॉटेल कीर्ती फॅमिली रेस्टॉरेंटच्या उद्घाटनाबाबत चुकीच्या बातम्या येत असून, हॉटेलच्या कार्यक्रम पत्रिकेत फॅमिली रेस्टॉरेंट असा स्पष्ट उल्लेख आहे. विरोधकांकडे युती सरकारवर आरोप करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसल्याने ते उसने अवसान आणून तथ्यहीन आरोप करत आहेत. राज्यातील बहुतांशी बिअर बार हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच आहेत, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे नेते मुकुंद गर्जे यांनी मंगळवारी केला.
पत्रकात म्हटले आहे की, रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या पत्रिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही नावे होती. त्यातील काहीजण उपस्थितही होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. टीका केवळ भाजपच्या मंत्र्यांवर करण्यात आली. या पत्रकावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुवेंद्र गांधी, पाथर्डी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, पारनेर तालुकाध्यक्ष तुषार पवार, मुन्ना काझी, नितीन शेलार, शांताराम वाबळे, गंगाराम खेडकर यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...