आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धेत पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ग्रामीण भागातही आता शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. सर्वसामान्य शेतकरी पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. परिणामी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी कमी नसल्याचे पुढे येत आहे, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
शेंडी-पोखर्डी येथील अॅड. आरती अरुण पुंड यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सावता परिषदेच्या वतीने आमदार कर्डिले यांच्या हस्ते पुंड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष अमोल धाडगे, जिल्हा संघटक आदिनाथ शेलार, तालुकाध्यक्ष निखिल शेलार, संदीप कर्डिले, अपंग विकास मंचाचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे आदी उपस्थित होते. कर्डिले म्हणाले, अॅड. पुंड यांनी जिल्हा न्यायालयात वकिली करतानाच सातत्यपुर्ण अभ्यास मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. खडतर प्रवासातून न्यायाधीश पदापर्यंत मजल मारणाऱ्या अॅड. पुंड यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवून सावता परिषदेने संबंधितांना प्रोत्साहन इतरांना प्रेरणा देण्याचे स्तुत्य काम करत आहे. यावेळी दत्ता दळवी, अविनाश शिंदे, संजय कचरे, शेखर पुंड, आकाश धाडगे, कैलाश शेलार, संतोष धाडगे, अजीज शेख, बापू शिंदे, अनिल करांडे, दीपक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड सार्थ ठरवू
सातत्यपूर्ण अभ्यासातून यश संपादित करता आले. वकिलीचा व्यवसाय सांभाळून अभ्यास करण्याची कसरत करावी लागली. व्यवसाय सांभाळून यश मिळवता आल्याचा आनंद आहे. पदाच्या माध्यमातून योग्य काम करून निवड सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अॅड. पुंड यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...