आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमिक शाळांचे विद्यार्थी होणार प्रगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर / कुकाणे - नववी दहावीतील विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी २०१६-२०१७ वर्षात माध्यमिक स्तरावरही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील हजार ८१ शाळांमधील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी गणित विषयांची पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ढासाळल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने विद्यार्थी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत २०१५-२०१६ शैक्षणिक सत्रात संपूर्ण राज्यात प्राथमिक विभागासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता माध्यमिक स्तरावरही हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर नववी दहावीपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण दिसून आले आहे. यापार्श्वभूमीवर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम माध्यमिक स्तरावर राबवण्यात येणार आहे. यासाठी गणित, इंग्रजी विषयांची पायाभूत चाचणी घेतली जाणार आहेत. राज्यात २२ हजार ७५६ माध्यमिक शाळा अाहेत. यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

माध्यमिक स्तरावर उपक्रम राबवण्याबाबत १६ सप्टेंबरला शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर माध्यमिक विभागाने कार्यक्रम राबवण्यासाठी नियोजन आखले. त्यानुसार १८ सप्टेंबर गणित विज्ञान संघटनांची बैठक घेण्यात आली. २६ सप्टेंबरला जिल्हास्तर संघटनांची बैठक घेतली त्यासाठी १२० पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ऑक्टोबरला अधिकारी, ऑक्टोबरला संस्थाचालकांची बैठक घेऊन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.

पायाभूत चाचणी मागील वर्षीच्या अभ्यास क्रमावर आधारित घेतली जाईल. एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळांतील प्रत्येक शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण करण्यास साहाय्य करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी गळती शून्यावर आणणे, प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित क्षमता प्राप्त केली की नाही हे तपासणे ज्या विषयात अडचणी असतील, तर कृती कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे, माध्यमिक स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा सरकारचा हेतू आहे.

का होते विद्यार्थ्यांची गळती?
आठवीपर्यंत मुलांना नापास करण्याचे शासनाचे धोरण असल्याने काही अपरिपक्व विद्यार्थी नववीपर्यंत पोहोचतात. दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी नववीत असे विद्यार्थी नापास केले जातात, तसेच काही शाळांत नववीच्या तुलनेत दहावीच्या तुकडी कमी असल्यानेही मुले नापास होतात. या कारणांमुळे विद्यार्थ्यांची गळती होते.

दिवाळीनंतर होणार तारीख जाहीर
^माध्यमिक स्तरावरमुख्याध्यापक संघटनांची बैठक घेतली. प्रगत शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीची तारिख दिवाळीनंतर जाहीर केली जाईल. या माध्यमातून गणित, इंग्रजी, विज्ञान विषयात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्याला प्रगत केले जाईल.'' लक्ष्मणपोले, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक).
बातम्या आणखी आहेत...