आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर साईबाबांच्या दानपेटीत साडेनऊ कोटी दान, एक हजार रुपयांच्या 1 कोटी 27 लाख नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - केंद्र सरकारने एक हजार व पाचशे रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतरही शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत २४ दिवसांत साईभक्तांनी तब्बल साडेनऊ कोटींचे दान टाकले आहे. यात १ हजार रुपयांच्या १ कोटी २७ लाखांच्या व पाचशे रुपयांच्या १ कोटी ५७ लाख रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्याचे जाहीर केले. त्यानंतर शासनाच्या आदेशान्वये साईबाबा संस्थानने दान स्वरूपात येणाऱ्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणे बद केले होते. मात्र, भक्तांनी नोटबंदीनंतर दानपेटीत हजार, पाचशेच्या नोटा टाकल्या आहेत. २४ दिवसांत साडेनऊ कोटींचे दान टाकले. या दानात एक हजार रुपयांच्या नोटांचे १ कोटी २७ लाख तर पाचशेच्या नोटांच्या १ कोटी ५७ लाख रुपयांचा समावेश आहे. एकूण २ कोटी ८४ लाख रुपयांच्या हजार, पाचशेच्या नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. संस्थानने ही रक्कम शिर्डीतील बँक खात्यात जमा केली आहे.

आयकरकडून चाचपणी
२४ नोव्हेंबरनंतर हजार, पाचशेच्या नोटा दानपेटीत न टाकण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने भक्तांना केले होते. मात्र, तरीही भक्तांनी दानात हजार, पाचशे रुपयांच्या नोटा टाकल्या आहेत. अशा ७१ लाख रुपयांच्या नोटा साईबाबांच्या तिजोरीत पडून आहेत. आयकर विभागानेही साई संस्थानला त्यांच्याकडे आलेल्या नोटांचा हिशेब मागितला आहे. साई संस्थान लवकरच हिशेब सादर करणार असल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...