आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्कीनंतर आता पौष्टिक बिस्किटे चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
नगर- अंगणवाडीतील बालकांना वाटण्यात आलेली राजगिरा चिक्की खराब असल्याचे समोर आले. आता पौष्टिक बिस्किटेही विनापरवाना पुरवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात जि. प. महिला बालकल्याण विभागाने कानावर हात ठेवत वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवले आहे.
जि. प. महिला बालकल्याण विभागाच्या अखत्यारित सुमारे हजार अंगणवाड्या असून त्यामध्ये लाखो बालके पूर्व प्राथामिकचे धडे घेत आहेत. या बालकांसाठी सरकारमार्फत पोषण आहार पुरवला जातो. काही दिवसांपूर्वी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत सूर्यकांता राजगिरा चिक्कीची लाख ७७ हजार पाकिटे पुरवण्यात आली. ही चिक्की खराब असल्याचा आरोप झाल्यानंतर विविध प्रयोगशाळांत तिची तपासणी करण्यात आली. अन्न आणि आैषध प्रशासनाकडून आलेल्या अहवालात चिक्की खाण्यास योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुरवठादाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यासाठी शतावरी पौष्टिक बिस्किटांची लाख १९ हजार पाकिटे पुरवण्यात आली. या बिस्किटांसंदर्भात सध्यातरी पालकांकडून अथवा नागरिकांकडून तक्रार आलेली नाही. पण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडियाच्या मान्यतेशिवाय या बिस्किटांचा पुरवठा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादाराची चौकशी होऊन दोषी असल्यास कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बालकल्याण अनभिज्ञ
बिस्किटांचेप्रत्यक्ष वाटप झाले किंवा नाही, याबाबत जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभागच अनभिज्ञ आहे. संबधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी बिस्किटांचा पुरवठा प्रकल्पस्तरावर झाला असल्याचे सांगून माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.