आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम, पाच दिवसांत झाल्या अकरा हजार सह्या नगरमध्ये मिळतोय मोठा प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणेदरम्यान सध्याच्या मार्गावरूनच इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करावी, या मागणीसाठी सुरू झालेल्या सह्यांच्या मोहिमेस नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. विविध ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत नगरकरांनी पाच दिवसांत अकरा हजार सह्या करून या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवल्याची माहिती नगर-पुणे कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी दिली.
गेल्या मंगळवारी एसटीच्या पुणे स्थानकावर सकाळी तीन तास ही मोहीम सुरू करण्यात आली. बुधवारी ही मोहीम सकाळी वाडिया पार्क क्रीडा संकुलाजवळ राबवण्यात आली. त्यानंतर भिंगार जॉगिंग पार्क, प्रोफेसर कॉलनीतील जॉगिंग पार्क, प्रोफेसर कॉलनी चौक, न्यू आर्टस कॉमर्स कॉलेज येथे ही मोहीम राबवण्यात आली. शनिवारी सायंकाळी कापडबाजारात ही मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी अनेकांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक संस्थांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेला पाठिंब्याचे पत्रही देण्यास सुरुवात केली आहे. केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन, शेती मशिनरी असोसिएशन, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशन, या संस्थांनी पाठिंब्याचे पत्र कृती समितीकडे दिली आहेत. अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी वधवा यांच्याशी पाठिंब्याबाबत संपर्क केला आहे.
‘दिव्य मराठी’ने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या रेल्वेच्या मागणीसाठी नगर-पुणे रेल्वे कृती समिती स्थापन झाली आहे. या समितीद्वारे या रेल्वेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या अभियानाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरू झाला. कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांच्यासह उपाध्यक्ष अर्शद शेख, सदस्य प्रशांत मुनोत, सदस्य अशोक कानडे, संजय सपकाळ, अजय दिघे, सुरेश रुणवाल, संजय वाळुंज, संतोष बडे, विपूल शहा, शशिकांत लाटे, सय्यद साबीर अली, विश्वनाथ पोंदे, दिलीप गंधे, किशोर रेणावीकर, किरण भंडारी ही मोहीम राबवत आहेत. एका छापील फॉर्मवर वरच्या बाजूला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना उद्देशून या रेल्वेसेवेची मागणी करण्यात आली आहे. त्याच्या खाली नागरिकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. सह्यांबरोबर प्रवासी नागरिकांचे मोबाइल क्रमांकही त्यावर नोंदवण्यात येत आहेत. १५ तारखेपर्यंत ही मोहीम शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सह्या गोळा करण्यात येणार आहेत. जे लोक या मोहिमेत सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांनाच या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे वधवा यांनी सांगितले. हे सह्यांचे निवेदन रेल्वेमंत्री प्रभू यांना १५ डिसेंबर रोजी पाठवण्यात येणार आहे. ते त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कृती समितीचे सदस्य जाणार आहेत.
रेल्वेमंत्र्यांना ट्विटरवर संदेश पाठवा
नगर-पुणेइंटरसिटी रेल्वेची मागणी करण्यासाठी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटर हँडलवर मागणी नोंदवण्याचे आवाहन वधवा यांनी केले आहे. प्रभू ट्विटरवर तातडीने दखल घेऊन त्याला प्रतिसादही त्वरेने देतात, असे त्यांनी सांगितले. हे ट्विटर हँडर पुढीलप्रमाणे आहे : @sureshprabhu@railminIndia Demand of Citizens Pls start # Ahmednagar Pune # Intercity # Shuttle # Train
सर्व महाविद्यालयांत होणार मोहीम
नगर- पुणे रेल्वेसाठी सुरू असलेली ही सह्यांची मोहीम नगर शहरातील सर्व महाविद्यालयांमध्येही राबवण्यात येणार आहे. कारण याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये पुणे शहराशी अधिक संपर्क येणार आहे. फक्त नगर शहरातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. नगर-पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुण्यात राहावे लागणार नाही.
बातम्या आणखी आहेत...