आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे पुुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तब्बल दीड महिन्याच्या विश्रातीनंतर नगर शहर जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या २३.२४ टक्के पावसाची नोंद झाली अाहे.

यंदा जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. सलग आठ दिवस पावसाचा जोर कायम होता. मात्र, १५ जूनपासून पाऊस थांबला. मागील ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांची वाढही खुंटली होती. जून ते २० जुलैदरम्यान जिल्ह्यात २१ टक्के पावसाची नोंद झाली होती.
पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामासमोर संकट उभे राहिले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने केवळ १३.९३ टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा जूनपासून पाऊस सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्या होत्या. जून ते १५ जुलैपर्यंत अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे जामखेड तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, १५ जूनपासून पाऊस थांबल्याने बाजरी, नागली, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, मटकी, हुलगा, पावटा, चवळी, वाल, वाटाणा या पिकांची वाढ खुंटली आहे.

पाऊस थांबल्याने सुमारे लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, सोमवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. नगर शहरासह भिंगार, केडगाव, नागापूर, वाळकी, चिचोंडी पाटील या भागात चांगला पाऊस झाला.

पाणीसाठ्यात वाढ
मुळाभंडारदरा पाणलोटक्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे साठ्यात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी भंडारदऱ्यात ३९.१७ टक्के साठा झाला. गेल्या वर्षी केवळ ३२.८७ टक्के साठा होता. मुळा धरणात २३.६४ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी २१.९६ टक्के साठा होता. आढळा धरणात ९१.३९, मांडआेहोळ २१.३२, घोड २६.१३, खैरी ३३.५ सीना धरणात १.५ टक्के पाणीसाठा आहे.

२४ तासांतील पाऊस
जिल्ह्यातगेल्या २४ तासांत १०.६४ मिलिमीटर पाऊस झाला. अकोले ६६, श्रीरामपूर ७, नेवासे ६, राहुरी १८.४, नगर ६, शेवगाव १६.३, राहाता ८, संगमनेर १०, पाथर्डी पारनेर येथे ४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. श्रीगोंदे, कर्जत, कोपरगाव जामखेड तालुक्यात मात्र पाऊस झालेला नाही. नगर शहरात नालेगाव ६, केडगाव भिंगार येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
अकोले तालुक्यात भात आवणीचे काम वेगात सुरू झाले आहे. छाया : शिवानंद भांगरे
बातम्या आणखी आहेत...