आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त: नऊ दिवसांनी सापडला खांडगाव येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांनी नवरदेवाचा गूढ पद्धतीने मृत्यू होऊन नवव्या दिवशी स्वत:च्या शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. तालुक्यातील खांडगाव येथील राजेंद्र हरिभाऊ चव्हाण (२५) याचे दहा एप्रिलला लग्न झाले. १५ एप्रिलला तो पत्नीसह मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी गेला. तेथे अज्ञात व्यक्तीने राजंेद्रला पेढा खायला दिला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटून पोटात दुखायला लागले. पती-पत्नी दोघेजण घरी आले. दुसऱ्या दिवशी अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यावर बाहेर गेलेला राजेंद्र घरी परतला नसल्याने १८ एप्रिलला अशोक चव्हाण याने भाऊ बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दिली. शोध घेत असताना २४ एप्रिलला त्याचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीतून नातेवाईकांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. त्यावेळी मृताच्या भुवया कापलेल्या, डोक्यावर शेंडी, दोन्ही पायांमध्ये नारळ ठेवलेला एका पायाला शेंदूर लावलेला अाढळून आला. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी अद्यापपर्यंत अकस्मात मृत्यूशिवाय अन्य कोणतीही कलमे लावलेली नाहीत. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही होईल.