आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधानंतरही 'मॉडेल'वर पैसे खर्च केल्याने नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घरकुल योजनेसाठीच्या 'मॉडेल' वर खर्च करण्याला नियामक मंडळाने विरोध केला असतानाही ग्रामीण विकास यंत्रणेने सुमारे ५० लाख रुपये खर्च केले. या मुद्द्यावरून बैठकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी (डीआरडीए) अनेक बाबी परस्पर करत असल्याचाही आरोप बैठकीत आरोप झाला. यावरून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाची बैठक गुरुवारी जिल्हा परिषदेत झाली. अध्यक्षा मंजूषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, समाजकल्याण सभापती मीरा चकोर, संभाजी दहातोंडे, नियामक मंडळाचे डॉ. अजित फुंदे, पोपट खोसे, महिला प्रतिनिधी माधुरी लोंढे, उषा गोर्डे, प्रकल्प संचालक सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. घरकुलांचे मॉडेल पाहण्यासाठी ५० लाखांची योजना होती. या निधीतून मॉडेल तयार करण्यात येणार होते. नियामक मंडळाने मॉडेलवर खर्च करण्यास यापूर्वीच विरोध दर्शवला होता. प्रशासनाने ग्रामपंचायतीला मॉडेल देऊन निधी खर्च केला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या निधी खर्चाबाबत नियामक मंडळाची परवानगी घेतली जाते, सदस्यांनी विरोध केल्यानंतर असताना परस्पर निर्णय घेतला कसा? असा प्रश्न फुंदे यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी जुजबी उत्तरे दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड. छाया : सचिन शिंदे.
बातम्या आणखी आहेत...