आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजलच्या फाशीचा निर्णय आधीच व्हायला हवा होता..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला फाशी देण्यात आल्याचे वृत्त समजताच बहुसंख्य नगरकरांनी आनंद व्यक्त केला. मात्र, या निर्णयाला खूप उशीर झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

हल्ला झाला तेव्हा भाजपचे खासदार दिलीप गांधी संसदेत होते. ते म्हणाले, तो दिवस आठवला की, आजही अंगावर शहारा येतो. मी त्यावेळी रेल्वेमंत्री राम नाईक यांच्या दालनात मी चर्चा करत होतो. तेवढय़ात बाहेर फायरिंगचा आवाज आला. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी मी गॅलरीतून वाकून पाहत असताना एका अतिरेक्याने माझ्या दिशेने गोळी झाडली. दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. अफजलला त्याचवेळी फाशी दिली असती, तर भारत दहशतवादाविरोधात आक्रमक आहे, हा संदेश गेला असता.

गेली अकरा वर्षे या दहशतवाद्याला बिर्याणीची मेजवानी देण्यात आली. राज्यकर्त्यांकडून नेहमीच सर्वसामान्य जनतेची अशी क्रूर चेष्टा केली जाते. मुंबईच्या गुंडांना जसे चकमकीत मारले जाते, तसेच दहशतवाद्यांचा चकमकीत खातमा करायला हवा, असे आमदार अनिल राठोड म्हणाले.

सरकारने कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर अफजलला फाशी दिली. मात्र, या फाशीला उशीर झाला, असे काँग्रेसचे उबेद शेख म्हणाले.दहशतवाद्यांना तातडीने शिक्षा होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची गरज आहे. देशाविरुद्ध कारवाया करणार्‍यांना दयामाया न दाखवता लगेच फाशी द्यायला हवी. अफजलला उशिरा का होईना, पण फासावर चढवल्याचा आनंद आहे, असे पतंजली योगपीठाचे उदय वाणी म्हणाले.