आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' नगरसेवकांमुळे रंगला कलगीतुरा ! शिवसेना नेत्यांना दिली "चायना वाघां'ची उपमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्यावेळी महापौर निवडीदरम्यान पक्षादेश डावलल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना पक्षाने निलंबित केले. याबाबत सध्या नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे याचिका प्रलंबित आहे. दरम्यान, काही महिन्यांतच पुन्हा महापौर पदाची निवड होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने निलंबित केलेल्या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. मनसे सचिव नितीन भुतारे यांनी खरमरीत प्रसिद्धीपत्रक काढून सेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध सेना असा सामना नगरकरांना पहायला मिळणार आहे.

महापौरपद निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही, म्हणून मनसे नगरसेवकांचे राजकारण संपवण्याची डरकाळी शिवसेनेचे नेते फोडत होते. आता मनसेने निलंबित केलेल्या याच नगरसेवकांना शिवसेनेत घेण्यासाठी नेते पायघड्या टाकत आहेत. शिवसेनेत डरकाळ्या फोडणारे खरे वाघ राहिले नसून "चायना वाघ' उरलेत आहेत की काय, अशी बोचरी टीका मनसेने केली आहे. मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याचा मनसेचे शहर सचिव नितीन भुतारे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

भुतारे यांनी पत्रकात म्हटले आहे की, जून महिन्यात महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापौरपदासाठी मनसेने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या विनंतीचा मान ठेवून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगून कोणतीही अट ठेवता केवळ विकासासाठी पाठिंबा द्यावा, असा आदेश पक्षाच्या सरचिटणीसांमार्फत नगरसेवकांना आला होता. पण तो पक्षादेश मनसे नगरसेवकांनी पाळला नाही. त्यामुळे नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला नाही, म्हणून पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

मनसेने पक्षादेश पाळल्यामुळे निलंबित केलेल्या नगरसेवकांची पदे रद्द व्हावीत, यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिकाही दाखल केली होती. केवळ शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे हे नगरसेवक मनसेने पक्षातून निलंबित केले होते. त्या नगरसेवकांचा मनसे पक्षाचा संबंध जूनलाच संपला. त्यामुळे त्यांच्याशी काही देणे-घेणे चर्चाही पक्षाची राहिलेली नाही. कोणाला कोणत्या पक्षात जायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, त्यावेळी पाठिंबा दिल्यामुळे या नगरसेवकांविषयी जे शिवसेनेचे नेते बोलले होते. सध्या नेमकी त्याच्या उलट चर्चा सुरू असल्याचे भुतारे यांनी म्हटले आहे.

त्यांची नावं जाहीर करू
शिवसेनेतीलखरे वाघ आता संपत चालले आहेत. सध्याच्या नेत्यांची कसलीच गॅरंटी, वॉरंटी उरली नसल्याचा आरोप करीत लवकरच पत्रकार परिषद घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गिरीश जाधव सचिव नितीन भुतारे सेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करणार आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांचा उल्लेख वारंवार चायनामेड वाघ असा करण्यात आला आहे. भविष्यात या नेत्यांवर जनतेने नेत्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी महापौर निवडीच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध मनसे, असा पारंपरिक सामना पुन्हा रंगणार आहे.
गॅरंटी संपलेले वाघ

ज्यांनीमागच्या महापौर निवडीच्या वेळी वाघासारख्या डरकाळ्या फोडत गप्पा मारल्या, ते आता मनसेने निलंबित केलेल्या नगरसेवकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे वाघ आता "चायना वाघ' झाले की काय, असे नितीन भुतारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निदान आता भविष्यात, तरी वाघाचे दाखले देऊन शिवसेनेच्या नेत्यांनी फसवाफसवी करू नये. कारण वाघाचे दाखले देत बोलणाऱ्या नेत्यांची कसलीच गॅरंटी, वॉरंटी उरलेली नाही, असा खोचक टोला भुतारे यांनी मारला आहे. शिवसेनेवर जनतेचा मनसेचा विश्वास उरला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.