आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : ... तर दोन्ही जागांवर पुन्हा निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रभाग११ १५ मधील सुमारे १३ हजार मतदारांना अवघ्या दोन वर्षांत पोटनिवडणुकीला तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसांनी (१० जानेवारी) होणाऱ्या या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, त्यापैकी तब्बल उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यांनी केवळ जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नाशिक जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पावती सादर केली आहे. त्यामुळे दोन्ही प्रभागांत पुन्हा पोटनिवडणूक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ३४ प्रभागांतील मतदारांनी ६८ नगरसेवक निवडून दिले. प्रभाग ११ मधील नगरसेवक अजिंक्य बोरकर प्रभाग १५ मधील नगरसेविका आरती भोसले यांचे पद रद्द झाले. दोघांनी सादर केलेली जात पडताळणी प्रमाणपत्रे खोटी निघाल्याने त्यांची पदे रद्द झाली. प्रभाग ११ ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर प्रभाग १५ ही जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. दोन्ही जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यापैकी उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्रच सादर केलेले नाही. त्यात प्रभाग ११ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार शोभा बोरकर अपक्ष उमेदवार काका शेळके, तसेच प्रभाग १५ मधील काँग्रेसच्या उमेदवार शीला चव्हाण राष्ट्रवादीच्या भारती भोसले यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नाशिकला जात पडताळणी समितीकडे अर्ज केला आहे. अर्ज सादर केल्याची पावती त्यांनी अर्जाबरोबर जोडली आहे. नाशिक जात पडताळणी समितीने त्यांचा प्रमाणपत्रासाठीचा अर्ज फेटाळला, तर या उमेदवारांसमोर पेच निर्माण होईल. चारपैकी एखादा उमेदवार निवडून आला त्याने सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर केले नाही, तर नगरसेवकपद रद्द होईल. परिणामी पुन्हा पोटनिवडणुकीला तोंड द्यावे लागेल.

प्रभाग १० वरही टांगती तलवार
प्रभाग१० मधील नगरसेविका विजया दिघे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत झिनत सलीम शेख विजयी झाल्या. निवडणुकीवेळी त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. सहा महिन्यांत त्यांना हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक होऊन सहा महिने उलटले आहेत. शेख यांनी प्रमाणपत्र सादर केले की नाही, याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. त्यांचे प्रमाणपत्र सादर झाले नसल्यास या प्रभागात कोणत्याही क्षणी पोट निवडणूक जाहीर होऊ शकते.

शासनाचे निर्देश
उमेदवाराकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल, तर त्याला हे प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला. १२ पैकी उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्राऐवजी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पावती जोडलेली आहे. भालचंद्र बेहेरे, निवडणूकनिर्णय अधिकारी.

िनवडणूक लादली
शिवसेना-भाजपने प्रभागातील नागरिकांवर निवडणूक लादली आहे. राज्यात त्यांचे सरकार आहे, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्राचे प्रकरण अजूनही उच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. आतादेखील आम्ही जातपडताळणी प्रमाणपत्राची पावती अर्जासोबत जोडलेली आहे. विरोधकांनी मनपातील सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा, असे आम्हाला वाटते. अजिंक्य बोरकर, माजी नगरसेवक.

नागरिकांनीच विचार करावा
खोटेजात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नागरिकांना पोटनिवडणुकीला तोंड द्यावे लागत आहे. प्रभाग ११ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केवळ पावती जोडली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर करता आले नाही, तर या प्रभागातील नागरिकांना पुन्हा पोटनिवडणुकीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान करण्यापूर्वी विचार करावा. संभाजी कदम, शहरप्रमुख,शिवसेना.