आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरड्या विहीरीत उपोषणाला बसला शेतकरी; विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतसंस्थेने जमीनीची जप्ती केली तर विहीरीत विष पिऊन आत्महत्या करणार असा इशारा सुद्धा या शेतकऱ्याने दिला आहे. - Divya Marathi
पतसंस्थेने जमीनीची जप्ती केली तर विहीरीत विष पिऊन आत्महत्या करणार असा इशारा सुद्धा या शेतकऱ्याने दिला आहे.
अहमदनगर - अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील शेतकरी आपल्या शेतातील कोरड्या विहीरीत उपोषणाला बसला आहे. नापीकी, दुष्काळ आणि शासनाच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झालेल्या या शेतकर्‍याच्या जमीन आणि घरावर सोमवारी पतसंस्थेची जप्ती येणार आहे. हीच जमीन आणि घर वाचवण्यासाठी शेतकऱ्याने कोरड्या विहीरीत उपोषणाला बसण्याचे पाऊल उचलले आहे. 
 
विष पिऊन आत्महत्येचा इशारा
पतसंस्थेने जमीनीची जप्ती केली तर विहीरीत विष पिऊन आत्महत्या करणार असा इशारा सुद्धा या शेतकऱ्याने दिले आहे.  अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव हे शेतकरी आपल्याच क्षेत्रातील कोरड्या विहरीत उपोषणला बसले आहेत. जोपर्यंत आपल्या सात-बारावरील बोजा कमी केला जात नाही आणि सोमवारी होणारी जप्ती थांबत नाही. तोपर्यंत विहीरीच्या बाहेर येणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे. 
 
1.5 लाखांचे कर्ज व्याजासह झाले 6 लाखांचे
२००५ मध्ये जाधव यांनी अकोलेच्या यशोमंदिर पतसंस्थेतून दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. 
सततचा दुष्काळ, नापीकी आणि पीक आले तरीही भाव नाही. अशा परीस्थितीत जाधव कर्ज भरू शकले नाहीत. आता या कर्जाचे व्याजासह जवळपास सहा लाख रुपये झाले आहेत. वसुलीसाठी पतसंस्था सोमवारी या शेतकऱ्याची 10 एकर जमीन आणि घर जप्त करणार आहे. अनेकदा दाद मागुनही सरकार माझ्यावर अन्याय करत आहे. अशी व्यथा या शेतकऱ्याने मांडली.
बातम्या आणखी आहेत...