आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्डिलेंविरुद्ध आझाद मैदानावर उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले व त्यांचे व्याही भानुदास कोतकर, जावई संदीप कोतकर यांच्याविरुद्ध सुरू असलेले न्यायप्रविष्ट खटले त्वरित चालवून निकाली काढण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. अन्यायग्रस्त नागरिकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

आमदार कर्डिले यांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून मुख्यमंत्री कोट्यातून चार सदनिका व तीन भूखंड मिळवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सन 2009 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवताना पुणे व मुंबईच्या सदनिकांचा उल्लेख आमदार कर्डिले यांनी प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून विलंब होत आहे. कोतवाली व भिंगार कँप पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल गंभीर गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. हे खटले तातडीने चालवून निकाली काढावेत. पवनऊर्जा प्रकल्पात शेतकर्‍यांची फसवणूक झालेली असून त्याची चौकशी करावी, या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शंकरराव राऊत, नंदू सुरासे, मिलिंद मोभारकर, केशव शिंदे, सिंधुताई कर्डिले, सागर बेरड, राहुल ढोले, ज्ञानेश्वर कर्डिले आदी या उपोषणात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदींनी उपोषण करणार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी (31 जुलै) आंदोलकांना भेटीसाठी वेळ दिल्याची माहिती जाधव यांनी दिली.