आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमालावरील निर्यातबंदी उठवा, खासदार गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेतीमालाबाबत केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करून सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची उठवा. उसाला प्रतिटन रुपये ३,५०० भाव एफआरपीनुसार पहिला हप्ता एकरकमी मिळालाच पाहिजे. सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च ५० टक्के नफा धरून हमी भाव द्यावा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष अशोक पटारे, युवा आघाडीचे अध्यक्ष बच्चू मोढवे, जिल्हा सचिव रुपेंद्र काले, संघटक राजू आघाव, राहुरी तालुका अध्यक्ष राजू जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडे, शिवाज जवरे, अनिल अौताडे, रावसाहेब खोत, हरिभाऊ तुवर, बाळासाहेब कदम, वामन तुवर, युवराज जगताप, राजेंद्र गोरडे, औशीराम चोळके, रावसाहेब गाडेकर, अशोक निमसे, सोन्याबापू कराळे, रवींद्र कराळे, संतोष तोडमल यांच्यासह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी शेतकऱ्यांनी गांधी यांच्या घरासमोर कांदा ओतून निषेध केला. पटारे यांनी खासदार गांधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोग लागू करा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. दुष्काळ पाटपाण्याअभावी पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार एकरी एक लाख रुपये भरपाई द्या. कायद्यातील तरतुदीनुसार शेतमाल आडतमुक्त करा. शेतीमालाच्या रास्त भावासाठी ज्वारी, बाजरी, मूग, मका शेतमालापासून इथेनॉलची निर्मिती करा आदी मागण्या करण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...