आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कृषी पीकविमा’त साडेतीन लाख शेतकरी, राम शिंदे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेत लाख ४५ लाख शेतकऱ्यांनी २२ कोटी ९५ लाख रुपयांचा हप्ता भरून खरिपाचा विमा उतरवला आहे, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, मुळा पाटबंधारे विभागाचे डी. एस. मुंजाळ, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एस. एम. कुलकर्णी, भुजल सर्वेक्षण विभागाचे ऋषिराज गोसावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लालू बाबुराव भांगरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एल. एस. पोले, जिल्हा अग्रणीचे व्यवस्थापक आर. एम. दायमा, कार्यकारी अभियंता वि. बि. थोरात, श्रीगोंदे कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. एन. कोळी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात १२ लाख १५ हजार शेतकरी असून, त्यापैकी ८० टक्के शेतकरी कृषी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेतील उद्दिष्ट सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावेत. जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या मंजुरीची प्रक्रिया आचार संहितेपूर्वी पूर्ण करावेत. दिले. महात्मा फुले जल भूमी संधारण अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यांना २५ कोटी मिळाले त्यापैकी जिल्ह्यास साडेपाच कोटी मिळाले, असे शिंदे म्हणाले.

अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी
अवयवदान अभियानाचे आगळे-वेगळे महत्त्व असून, या अभियानाची गरज आवश्यकता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. रुग्णसेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाअवयवदान मोहीम राबवण्यात येत आहे. असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...