आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिकार्ड योजनेला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारत संचार व कृषी विभागाच्या समन्वयाने सुरू करण्यात आलेल्या ‘महाकृषी ३’ योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतक-यांना कृषि विषयक माहिती व मार्गदर्शन माफक दरात मिळावे, या उद्देशाने बीएसएनएलने ही योजना अंमलात आणली. ‘महाकृषी १ व २’ या योजनेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सुमारे १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी कार्ड घेतले होते. ९ फेब्रुवारीपासून ‘महाकृषी ३’ या योजनेला नव्याने सुरुवात झाली. या योजनेचा कालावधी ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत होता. आता यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून ही योजना २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेची माहिती मिळते. या योजनेंतर्गत वीस रुपयांत सीमकार्ड मिळते. त्यासाठी १२८ रुपयांचे रिचार्ज दरमहा आवश्यक आहे. या योजनेतील ग्राहकांशी मोफत बोलता येते. प्रत्येक शेतकऱ्यास या योजनेंतर्गत तीन सीमकार्ड दिले जातात. महिनाभराच्या कालावधीतील सातबारा उतारा आवश्यक आहे. कृषी विभागाचा नमुन्यातील दाखला, रहिवासी पुरावा व रंगीत फोटो, तसेच कृषी अधिकाऱ्याचा दाखला ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. या योजनेच्या तिन्ही टप्प्यांत शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
योजनेचा लाभ घ्या...
या योजनेत नगर बीएसएनएलने पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ज्यांनी कृिषकार्ड घेतले नाही, त्यांनी बीएसएनएलच्या कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.”
डी. एस. ठुबे, उपमंडल अभियंता (विपणन), बीएसएनएल.