आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणातून सोडले शेतीसाठी आवर्तन, जायकवाडीसाठी मिळणार पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी/नगर सिंचनाच्या पाण्यासाठी आसुसलेल्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्राला दिलासा मिळाला. रविवारी दुपारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यांतून सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले. जलसंपत्ती नियमन अधिनियमन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार गोदावरी खाेरे विकास महामंडळाच्या आदेशाने सध्या मुळा धरणाच्या कालव्यातून जायकवाडीला पाणी सुरू आहे.
त्यामुळे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात अडथळा येत होता. लाभक्षेत्राची तातडीची निकड लक्षात घेत सरकारकडून पहिल्यांदाच समन्वयाची भूमिका घेण्यात आली असून जायकवाडीसह सिंचनालाही पाणी सोडण्यात आले.

रविवारी दुपारी साडेतीन वाजता उजव्या डाव्या कालव्यातून २०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. या दोन्ही कालव्यांतून जाणाऱ्या पाण्यातून राहुरी, नेवासे, पाथर्डी शेवगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला दिलासा मिळणार आहे. मुळा धरणात पाणी कमी असतानाही समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार यंदा जायकवाडीसाठी १.७४ टीएमसी (१७४० दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
न्यायालयाकडूनही दिलासा मिळाल्याने अखेर नोव्हेंबरला जायकवाडीसाठी धरणाच्या दरवाजांमधून पाणी सोडण्यात आले. पाणीपातळी दरवाजांखाली गेल्यानंतर डाव्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पाण्याच्या प्रश्नावर पहिल्यांदाच समन्वयाची भूमिका घेत सरकारकडून सिंचनाचे पाणी सोडण्यास हिरवा कंदील मिळाला. आदेशानुसार दोन्ही कालव्यांतून जायकवाडीसह सिंचनाला पाणी सोडण्यास रविवारी सुरुवात झाली.
सिंचनाच्या आवर्तनातच कालव्यावर अवलंबून असलेल्या योजनांसाठीही पाणी मिळणार आहे. हे आवर्तन २५ दिवस सुरू राहणार असून उजव्या कालव्याद्वारे टीएमसी, तर डाव्या कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी सिंचनासाठी मिळणार आहे. पूर्ण क्षमतेच्या रब्बी आवर्तनासाठी जवळपास पाच ते साडेपाच टीएमसी पाणी आवश्यक असते. मात्र, या आवर्तनासाठी साडेतीन टीएमसीच पाणी उपलब्ध असून यातूनच रब्बीच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. आमदार शिवाजी कर्डिले बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

मुळा धरणाच्या उजव्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठीचे पाणी चाक फिरवून सोडताना आमदार शिवाजी कर्डिले बाळासाहेब मुरकुटे. समवेत कार्यकारी अभियंता आनंद वडार, उपशाखाधिकारी श्याम बुधवंत.

पाणी काटकसरीने वापरा
दुष्काळामुळेलाभक्षेत्रात गंभीर परिस्थिती बनली असून खरिपानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती होती. पाण्याअभावी जळणाऱ्या पिकांना तातडीने पाण्याची गरज होती. या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधून मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. त्यास प्रतिसाद देत पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'' शिवाजीकर्डिले, आमदार.