आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेवासे येथील कृषी अधिकारी अडचणीत, विशेष घटक योजनेत अनियमितता उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेत नेवासे तालुक्यात अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे कारवाईसाठी फाइल आली आहे. तथापि, या प्रकरणी गोपनीयता बाळगली जात आहे.
कृषी विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना लाभ देण्याची योजना आहे. यात लाभार्थ्याला ५० हजारांचे अनुदान दिले जाते. अनुदान दिल्यानंतर संबंधिताने अनुदानानुसार खरेदी केली की नाही, याची तपासणी करावी लागते. नेवासे तालुक्यात बैलगाडी बैलजोडीचा लाभ देताना गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करून ३६ लाभार्थ्यांची चाैकशी केली. त्यात अनियमितता झाल्याचे समाेर आले. समितीने अहवाल दिल्यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यावरच निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे समजले. ही फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाने काहीही सांगण्यास नकार दिला. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चाही जिल्हा परिषदेत रंगली आहे.

फाईल पाहून निर्णय
^नेवासे येथील विशेष घटक योजनेसंदर्भातील फाईल माझ्याकडे आहे. कारवाईबाबत सध्यातरी निर्णय घेतलेला नाही. ही फाईल मी स्वत: पाहणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. रवींद्रबिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...