आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture University Take Developed Crops Patent

विकसित वाणांचे कृषी विद्यापीठांनी पेटंट घ्यावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - आपण विकसित केलेल्या वाणांवर आपला हक्क कायम राहावा, यासाठी सर्वच कृषी विद्यापीठांनी पेटंट मिळवणे गरजचे आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील पीक वाण संरक्षण हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. आर. आर. हंचिनाल यांनी केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मागोवा २०१५ या कार्यक्रमात डॉ. हंचिनाल बोलत होते.

डॉ. हंचिनाल म्हणाले, कृषी विद्यापीठांनी विविध कृषीच्या पदविका अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवक शेतीपूरक उद्योगाकडे वळतील. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन चांगल्या प्रकारचे आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतीसाठीचे केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालास योग्य भाव मिळाला म्हणजे शेतकऱ्यांना हाच मोठा सन्मान असतो. जोपर्यंत कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही. ते का पोहोचले नाही, याचे आत्मचिंतन करायला हवे. मार्केटिंगमुळे पाणी बंद बाटली २० रुपयांना विकली जाते. मात्र, दुर्दैवाने दुधाला १८ रुपये भाव मिळतो. कृषी पदवीधरांमध्ये उद्योगशीलता वाढवण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतीपूरक उद्योगाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाला कंपोस्ट मेकिंगची जोड दिल्यास खतनिर्मिती होऊन रासायनिक खतावरील खर्च कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. किरण कोकाटे, मिलिंद ढोके, सोपान कासार, बी. जी. निर्मळ, डॉ. भीमराव उल्मेक यांनी आपापल्या कार्याचा केलेल्या कामाची माहिती विशद केली. दहा जिल्ह्यांतील कामांचा आढाव घेतला. कृषी दैनंदिनीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.