आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahamadnagar Backstage Artist Association Organize Competition

हौशी रंगकर्मींसाठी कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हौशी रंगकर्मींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोसिएशन कार्यरत आहे. बॅकस्टेजबरोबरच नाट्यकलेशी पूरक अशा कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, एकव्यक्ती बहुपात्री अभिनय स्पर्धा या असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असतात.यंदाही १४ आणि १५ जुलै रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धा आणि राज्यस्तरीय खुल्या स्वलिखीत काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. कथाकथन स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुकांनी १३ जुलैपर्यंत तर काव्यवाचन स्पर्धेसाठी १४ जुलैपर्यंत आपले अर्ज अहमदनगर येथील अमृतेश्वर किराणा स्टोअर्स, मोरया सांस्कृतिक केंद्र पाईपलाईन रोड सावेडी येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी सागर जोशी यांच्याशी ९९२२४३४२३३ या क्रमांकावरही संपर्ध साधता येऊ शकतो.अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनचे हे अकरावे वर्षे असून अभिनेता मिलिंद शिंदे या असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी आहेत. यावर्षी अभिनेत्री हेमांगी कवी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
रंगभूमीवर सध्या सरावापेक्षा प्रयोगांना महत्त्व, ज्येष्ठ मणिपुरी रंगकर्मी कन्हाईलाल यांची खंत
रंगकर्मी कन्हाईलाल यांना तन्वीर सन्मान
'दिग्दर्शक व्हायचे स्वप्न पूर्ण झाले'