आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपर्डी खटला सुरू असताना मराठा मोर्चाला परवानगी कशी? आरोपीच्‍या वकीलांचा कोर्टात अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ नगर - ‘कोपर्डी प्रकरणाचा खटला अहमदनगर सत्र न्यायालयात सुरू असताना, त्यातील संशयित आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला परवानगी दिली कशी?  याबाबतची कारणे दाखवा नोटीस राज्याचे गृह सचिव आणि पोलिस महासंचालक यांना काढण्यात यावी’ या मागणीचा अर्ज या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमेचे वकिलांनी गुरुवारी नगरच्या सत्र न्यायालयात केला. त्यावर ३० ऑगस्ट रोजी सरकारी पक्ष न्यायालयात म्हणणे मांडणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.    
 
दरम्यान, या  खटल्यातील आरोपी संतोष भवाळच्या वतीने वअॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे डायरेक्टर, तसेच नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांना साक्षीसाठी बोलावण्यासाठीची मागणी सर्वाेच्च न्यायालयात करण्यात अाली हाेती. मात्र न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावली.
 
यापूर्वी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनीही हा अर्ज फेटाळला होता. नंतर आरोपीच्या  वतीने औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. तिथे खंडपीठाने केवळ चव्हाण यांनाच साक्षीदार म्हणून तपासण्यास मान्यता दिली. इतरांना बचाव पक्षाचे साक्षीदार करण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.  

व्हीसीद्वारे साक्ष नको
बचाव पक्षाचे साक्षीदार चव्हाण गुरुवारी नगरच्या न्यायालयात सुनावणीला गैरहजर होते. आजारी असल्यामुळे डॉक्टरांनी आणखी दहा दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. तसा अर्ज त्यांच्या वतीने अॅड. ए. एच. अहिरे यांनी सादर केला. त्यावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची साक्ष घेण्याबद्दल विचारणा केली. मात्र, अॅड. निकम यांनी त्यास नकार दर्शवला. त्यामुळे आता ३० आॅगस्टला त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा कोपर्डी तालुक्यात घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम..
बातम्या आणखी आहेत...