आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahemadnagar Didtrict Two Years In 28 Model Grampanchayat

दोन वर्षांत जिल्ह्यातील २८ ग्रामसेवक आदर्श, रखडलेल्या पुरस्कारांना मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हापरिषदेच्यावतीने देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन २०१३ पासून रखडलेले होते. परंतु, यावर्षी हे पुरस्कार देण्याचा मुहूर्त जिल्हा परिषदेने काढला आहे. जिल्हा परिषदेने रखडलेल्या २०१३ आिण २०१४ या दोन्ही वर्षांतील २८ आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. लवकरच या ग्रामसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. मागील वर्षीपासून हे पुरस्कार रखडलेले होते. यावर्षी मात्र, पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी यांच्या मान्यतेने तालुकास्तरावरून आदर्श ग्रामसेवकांची नावे सादर केली जातात.

जिल्हा पातळीवरील समिती ही यादी अंतिम करून जाहीर करते. गावपातळीवरील राजकारण पदाधिकाऱ्यांचा कारभार यामध्ये ग्रामसेवकाला काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच काही ग्रामसेवकांवर राजकीय दबावातून गैरव्यवहार केल्याचे, दप्तर सादर केल्याचेही आरोप होत असतात. परंतु, जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक निवडताना या सर्वबाबी तपासूनच पुरस्कार जाहीर केलेले आहेत.

जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्यास आदर्श ग्रामसेवक पुढीलप्रमाणे : "आदर्श ग्रामसेवक : २०१२-२०१३ या वर्षासाठी रवींद्र ताजणे (अकोले), सीताराम निकम (संगमनेर), नेताजी भाबड (कोपरगाव), रावसाहेब खर्डे (राहाता), रवींद्र लांबे (श्रीरामपूर), रखमाजी लांडे (राहुरी), भारत खाटीक (नेवासे), सुनील जाधव (शेवगाव), जालिंदर कोठुळे (पाथर्डी), विश्वनाथ खेंगरे (जामखेड), कैलास तरटे (कर्जत), बाळासाहेब माने (श्रीगोंदे), अशोक खळेकर (पारनेर), ज्ञानदेव अडसुरे (नगर). तसेच २०१३-२०१४ मध्ये बाळू मुंढे (अकोले), राजेश गुंजाळ (संगमनेर), राजेंद्र बागले (कोपरगाव), श्रीराम कोते (राहाता), उदय मिसाळ (श्रीरामपूर), बाळासाहेब म्हस्के (राहुरी), राजेंद्र मेहेत्रे (नेवासे), अशोक नरसाळे (शेवगाव), अनिल भाकरे (पाथर्डी), अमोल जाधव (जामखेड), वर्षा थोरात (कर्जत), लताबाई गायकवाड (श्रीगोंदे), संजय गवळी (पारनेर) सुरेंद्र बडे (नगर) यांचा समावेश आहे. या दोन वर्षांच्या २८ आदर्श ग्रामसेवकांमध्ये दोन आदर्श महिला ग्रामसेवक आहेत.