आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाह्यवळण रस्त्याला प्रतीक्षा मजबुतीकरणाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अवजड वाहतूक या रस्त्याने न जाता शहरातूनच जात आहे. वाढलेल्या रहदारीच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडत असून, त्यामुळे नगरकरांना दररोजच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज लाखो रुपयांचे इंधन वाया जाते.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी सन 2007-08 मध्ये बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तब्बल सहा वर्षे हे काम चालले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी 1 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन शहरांतर्गत रहदारीवर पडणारा 50 टक्के ताण कमी होईल, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर इंधनाच्या वापरातही बचत होऊन शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणही कमी होणार होते.

पुणे, कल्याण, मनमाड व औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहतूक या बाह्यवळण रस्त्याने जाणे अपेक्षित होते. तथापि, या रस्त्यावर मोठ्ठे खड्डे पडल्याने अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून न जाता शहरातील जुन्याच रस्त्यावरून सुरू आहे. बाह्यवळण रस्त्याचे काम अनेक वर्षे निंबळक येथील रेल्वे उड्डाणपुलाअभावी रखडले होते. शासनाने उड्डाणपुलासाठी 14 कोटी रुपये व भराव रस्त्यासाठी 9 कोटी असा 23 कोटींचा निधी दिल्यानंतर हा मार्ग सुरू झाला. वळण रस्ता खुला झाल्याने शहरातून जाणार्‍या अवजड वाहतुकीचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. रेल्वे उड्डाणपुलाचे मजबुतीकरण अजून झालेले नाही. पुलावर खडी टाकल्याने दुचाकीचालक घसरून पडतात.

गेल्या आठवड्यात नगर दौर्‍यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळण रस्त्याबाबत मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन महापौर संग्राम जगताप यांना दिले होते. त्यानुसार गेल्या सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी दहा कोटी रुपये देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मात्र, अजून तरी हा निधी मिळालेला नाही.
30 जुलैपर्यंत निधी अपेक्षित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक बोलावून संबंधित विभागाला नगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 10 कोटी व रेल्वेपुलासाठी 4 कोटी असे 14 कोटी देण्याचा लेखी आदेश दिला. निधीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. येत्या 30 जुलैपर्यंत हा निधी मिळणे अपेक्षित आहे.’’
संग्राम जगताप, महापौर.
हिंदी व इंग्रजीतून फलक लावा
४ पुणे, औरंगाबाद व कल्याणकडून बाह्यवळण रस्त्याने जाणार्‍या वाहनांसाठी संबंधित वळणावर फलकलावण्यात आले आहेत. तथापि, हे फलक मराठीतून असल्याने परप्रांतीय वाहनचालकांना ते वाचता येत नाहीत. त्यामुळे ते जुन्याच रस्त्यावरून वाहने नेतात. वळणावर हिंदी व इंग्रजीतील फलक लावण्यात यावेत.’’
रामलाल यादव, वाहनचालक.
वाहतूक कोंडी अद्याप कायम
औरंगाबाद व पुण्याहून येणारी अवजड वाहतूक नगर शहरातूनच जाते. अवजड वाहतुकीमुळे चांदणी चौक, डीएसपी चौक, औरंगाबाद नाका, कोठला स्थानक, जीपीओ चौक, कोठी चौक, इम्पिरियल चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक या भागात वाहतूक कोंडीची समस्या अजून कायम आहे.
डिटची खेळी करण्यात आली. ठेकेदाराला कामाची 80 टक्के बिले अदा करण्यात आली आहेत. न्यायालयात जाण्याचा व घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशी करण्याबाबत पत्रव्यवहार सुरू झाला आहे. पाठपुराव्याला यश आले.’’
शाकीर शेख, तक्रारदार.