आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय्य हक्कांआड सरकार आले, तर बंड करा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्याय्य हक्कांआड सरकार आले, तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका...असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हरेगाव येथे १६ डिसेंबर १९३९ रोजी झालेल्या मंुबई इलाखा वतनदार महार परिषदेत बोलताना सांगितले होते.

डॉ. आंबेडकरांच्या ५०० मर्मभेदी भाषणांचा संग्रह असलेल्या "बोल महामानवाचे' या त्रिखंडात्मक ग्रंथात हरेगावच्या या भाषणाचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रंथाचे संपादन डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले आहे. हरेगावची परिषद महार, मांग वेठिया यांच्या वतनाचा विचार करण्यासाठी बोलवण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत डॉ. आंबेडकर म्हणाले होते - या वतनदारांचे पहिले गाऱ्हाणे म्हणजे सरकारने अन्यायाने सुरू केलेली जुडीवाढ होय. मोबदला देता त्यांच्या जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या जमिनींच्या किमतीवरील व्याज त्यांना देणेही सरकारने आता बंद केले आहे. वतनदारीने त्यांच्यावर लादलेल्या या कामाबद्दल मिळणारा मोबदला अपुरा असून त्यांना जी नगद रक्कम देण्यात येते, तीसुद्धा अलीकडे बंद करून त्यांजवर आणखी एका अन्यायाचे ओझे लादण्यात आले आहे. अशा रितीने या दारदि्र्यात खितपत पडलेल्या लोकांची चारही बाजूंनी पिळवणूक करण्यात येत असून त्यांच्या दारदि्र्यात भर टाकण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले - काँग्रेस मंत्रिमंडळाने या वतनदारांना करावयाची १९ कामे नमूद करणारा एक जाहीरनामा नुकताच प्रसदि्ध केला आहे. त्यापैकी काही कामे या गावकामगारास करणे अशक्य आहे. ही झाली वतनदार कामगारांची रडकथा. याशविाय खेडोपाडी असे अनेक गावकामगार आहेत, की त्यांना सरकारी कामे करावी लागतात. पण त्यांना जमिनी मात्र दिलेल्या नाहीत सरकारी पगारही नाही. गावात भीक मागून त्यांना आपली गुजराण करावी लागते. मरमर मरेपर्यंत त्यांना सरकारी कामे करावी लागतात. या इमानदार नोकरांस पगारपाण्याशविाय तडफडत जीवन कंठणे सरकार भाग पाडीत आहे, हा केवढा अत्याचार!

"जुडी' हे काय प्रकरण आहे, हे डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले. ते म्हणाले - सरकारी नोकरांना वतनी जमिनी देण्याची पुरातन चाल आहे. ती पेशवाई मुसलमानी राज्यात जारी होती. त्यावेळची परिस्थिती आजच्याहून भिन्न होती.
आंबेडकरांवरील ग्रंथाचे सिक्कीममध्ये प्रकाशन
प्रा.रतनलाल सोनग्रा यांनी लिहिलेल्या "विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर - मैत्रेय बुद्ध' या हिंदीतील ग्रंथाचे प्रकाशन बुद्ध जयंतीला (४ मे) सिक्कीम येथे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आंबेडकरांच्या ठायी दान, शील, प्रज्ञा, सत्य, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा, वीर्य, शांती आणि नैष्कर्म्य या दहा पारमिता कशा एकवटल्या होत्या, हे या ग्रंथात दाखवण्यात आले आहे.
...तर धन्यास ठोकर मारण्यास शिक
धनीपगार देत नाही, तर धन्यास ठोकर मारण्यास नोकरांनी शिकले पाहिजे. या परिषदेद्वारे आपण आज सरकारास सहा महिन्यांची नोटीस देऊ. या मुदतीत सरकारने कामगारांस योग्य पगार देण्याची व्यवस्था केली, तर ठीक, नाही तर विनावेतन काम करणाऱ्या लोकांनी इलाखाभर संप पुकारावयास हवा, असे माझे सांगणे आहे, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले होते.