आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सारेगमप लिटील चॅम्प्स'ची विजेती अंजलीला अहमदनगर महापालिकेकडून एक लाखाची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- झी मराठी टीव्ही चॅनलवरील लोकप्रिय शो 'सारेगमप लिटील चॅम्प्स'ची विजेता मराठमोळ्या अंजली गायकवाड हिला अहमदनगर महापालिकेतर्फे एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे. महापौर सुरेखा कदम यांनी ही घोषणा केली असून आठ दिवसांत अंजलीकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात येणार आहे.

अंजली मूळची अहमदनगरची...
11 वर्षीय अंजली ही मूळची अहमदनगरची आहे. या शोमध्ये अंजलीची बहीण नंदीनीनेही सहभाग घेतला होता.  पण दुर्दैवाने ती शोच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नाही. लिटील चॅम्पस शो सुरु झाला तेव्हापासून अंजली ही टॉप 5 मध्ये होती. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि जावेद अली व्यतिरीक्त 30 सदस्यीय ज्युरींनी हा शो जज केला.

6 स्पर्धकांना मागे टाकत अंजलीने पटकावला किताब
जयपूर येथील एका स्टुडिओमध्ये पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये अंजलीने 6 स्पर्धकांना मागे टाकत किताब आपल्या नावे केला.

अंजलीसोबतच श्रेयण भट्टाचार्यही ठरला विजेता
एका शोमध्ये एक नाही तर दोन स्पर्धकांना विजेता घोषित करण्‍यात आले आहे. सारेगमपच्या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले आहे. अंजलीसोबतच श्रेयण भट्टाचार्य हाही लिटील चॅम्पसचा विजेता ठरला आहे. फिनालेमध्ये श्रेयणने ‘हवाएं’, सूरज डूबा’ आणि ‘जालिमा’ यासारखी गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले तर अंजलीने ‘दीवानी मस्‍तानी’, ‘झल्‍ला वल्‍ला’ ‘मैं कोल्‍हापुर से आई हूं’ ही शानदार गाणी गायली.

वाईल्ड कार्ड इंट्री होती अंजली गायकवाड..
उल्लेखनिय म्हणजे, अंजलीने तिच्या सुमधुर आवाजाने अल्पावधीत सर्वांची मने जिंकली होती. वाईल्ड कार्ड इंट्री घेऊन आलेली नंदीनीने काही दिवसांतच स्वतःमधील टॅलेंट सगळ्यांना दाखवून दिला. शोमध्ये अंजलीची बहीण नंदिनी अगोदरच शोमधून आऊट झाली होती.

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंजली गायकवाडचे 'सारेगमप लिटील चॅम्प्स'मधील काही निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...