आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahemdnagar Guardian Minister Babanrao Pachpute Comment On Parner

पारनेरकरांचे दुखणे वेगळेच- बबनराव पाचपुते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुष्काळी परिस्थिती असल्याने मी पारनेरमध्ये दौरे काढून समस्या जाणून घेतल्या. तथापि, पारनेरच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण मला कळलेच नाही. हे दुखणे वेगळेच आहे, असे पालकमंत्री बबनराव पाचपुते रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पाचपुते म्हणाले, जिल्ह्यात मी आतापर्यंत 41 बैठका घेतल्या. पैकी 19 बैठका पारनेरमध्ये घेतल्या आहेत. पारनेरवर अन्याय झाला असे काही घडले नाही. पक्षाच्या जबाबदार्‍या मला चांगल्या माहिती आहेत. मी पक्ष बांधणारा माणूस आहे. जनावरांच्या छावण्या देण्याचा निर्णय प्रशासनाचा आहे. कोणाला छावणी कशी दिली हे प्रशासनच सांगेल. कार्यकर्त्यांच्या तक्रारीचा खुलासा मी केला, पण पारनेरच्या कार्यकर्त्यांचे दुखणे मला कळले नाही. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. डॉक्टरकडे गेले नाही, तर नेमका इलाज होणार नाही, हे बहुदा त्यांना माहीत नसावे, असा टोला पाचपुते यांनी मारला.