आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपी निवडणूक चाचपणीला प्रारंभ, निवडणूक स्वबळावरच होण्याची चिन्हे, श्रेष्ठी घेणार निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - 'मिनीविधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली. पंचायत समिती गणांमध्येही उमेदवारांचा शोध राजकीय पक्षांकडून सुरू आहे. या निवडणुकांची जय्यत तयारी सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. युती, आघाडीचा निर्णय श्रेष्ठींवर सोपवून सर्वच जागांवर उमेदवार देण्याचीही तयारी झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावरच होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेची २०१२ ची निवडणूक आघाडी, युती फिसकटल्याने स्वबळावर लढवण्यात आली. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेस २८, राष्ट्रवादी ३२, भाजप ६, शिवसेना ६, अपक्ष २, भाकप असे पक्षीय बलाबल होते. ७५ गट असल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी ३८ जागा मिळणे गरजेचे होते. केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस आघाडीचेच सरकार होते. त्यामुळे जिल्हा परिषदही आघाडीच्याच ताब्यात जाण्याची चिन्हे होती. त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत खलबते सुरू होती. पण ऐनवळी राष्ट्रवादीने काँग्रेसला क्का देत भाजप-सेनेशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन कारभार झाला. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा िनवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर पुन्हा आघाडीच्या श्रेष्ठींनी पुढील अडीच वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत कारभार सुरू आहे.

या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपणार असून आता सर्वांना २०१७ च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक ७३ गट १४६ गणांसाठी होणार आहे. गट गणांची आरक्षण सोडत नुकतीच झाली. त्यात जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांसह मातब्बरांचे गट राखीव झाले. राखीवसह सर्वसाधारण जागांवर खात्रीचे उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली अाहे. मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात तालुकानिहाय स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा परिषद निवडणुकांवर चर्चा झाली. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही शासकीय विश्रामगृहात तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात नगरपालिकांच्या निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, प्रवक्ते आमदार भाई जगताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांचे मेळावे झाले नसले, तरी उमेदवार चाचपणीला गती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांत बहुमत मिळवण्यासाठी भाजप, शिवसेनाही प्रयत्नशील आहे.

अध्यक्षपदासाठी अातापासून फिल्डिंग
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. या पदावर कुटुंबातील सदस्य बसवण्यासाठी मातब्बर नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. उत्तर नगर जिल्ह्याबरोबरच दक्षिण नगर जिल्ह्यातही या पदाचा उमेदवार देण्यासाठी दिग्गजांची तयारी सुरू आहे.

आघाडी झाल्यास बंडखोरीची भीती
आगामीजिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण प्रदेशपातळीवर आघाडी झाल्यास जागावाटपाच्या घोळात इच्छुक नाराज होतील. त्यातूनच बंडखोरीची भीती व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...