आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुबड्यांवरच होणार काँग्रेसचा अध्यक्ष, राष्ट्रवादी किंवा भाजपची मदत घ्यावी लागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा परिषदेच्या देहरे गटातून निवडून आल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार प्रताप शेळके यांनी असा जल्लोष केला.  छाया : मंदार साबळे - Divya Marathi
जिल्हा परिषदेच्या देहरे गटातून निवडून आल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार प्रताप शेळके यांनी असा जल्लोष केला. छाया : मंदार साबळे
नगर - नगरचा जिल्हा परिषदेचा गड पारंपरिकदृष्ट्या पुन्हा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिला आहे. २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्या, तरी मतदारांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.
 
कॉंग्रेसला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या असल्या, तरी सत्तेसाठी त्यांना पारंपारिक मित्रपक्ष राष्ट्रवादी किंवा भाजप-शिवसनेची मदत घ्यावी लागणार आहे. भाजप हा कॉंग्रेसचा मित्र नसला, तरी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंना मात्र त्यांना बरोबर घेण्यात काहीही अडचण येणार नाही.

कारण अशा प्रयोगाचा त्यांना चांगला अनुभव आहे. राष्ट्रवादीला बसलेला मोठा फटका हे या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. उलट, राष्ट्रवादीच्या अकोले नेवासे सारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना भाजपने खिंडार पाडण्यात यश मिळवले असले, तरी नगर तालुक्यात भाजपला आमदार शिवाजी कर्डिलेंसारखा मातब्बर नेता असताना भोपळाही फोडता आलेला नाही. तसा गडाख यांच्या पाच जागा जोडता आल्या, तर राष्ट्रवादीलाही अध्यक्षपदासाठी अंधुकशी संधी आहे. कॉंग्रेसच्या २३ जागांमध्ये थोरात यांना मानणारे त्यांच्या तालुक्यातील आठ इतर तीन असे ११ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता मिळवली तरी, अध्यक्ष कोणाच्या गटाचा करायचा, याबाबत मोठी रस्सीखेच होणार आहे. 
 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७३ जागा आहेत. गेल्यावेळी त्या ७५ होत्या. राष्ट्रवादी- ३१, कॉंग्रेस - २८, शिवसेना - ६, भाजप - ६, भारतीय कम्युनिस्ट पक्ष - इतर-३, असे बलाबल होते. जिल्ह्यातील सहकारावर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेवर आधी कॉंग्रेस अलीकडील काळात राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. यात यावेळी त्यात बदल होऊन सत्ता कॉंग्रेसकडे जाणार आहे. ‘फोर्टी प्लस’ही पालकमंत्री राम शिंदे यांची घोषणा केवळ वल्गना ठरली आहे. गेल्यावेळी सहा जागा असलेल्या भाजपच्या सदस्यांची संख्या १५ झाली असली, तरी राज्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या तुलनेत नगर जिल्ह्यातील यश नगण्य आहे. 

कारण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या वाढून ती पाच झाली. त्यातील मोनिका राजळे स्नेहलता कोल्हे पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच होत्या. या पाच आमदारांच्या मतदार संघात भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. त्यातल्या त्यात कोपरगाव नगर तालुक्यात भाजपला एकही जागा मिळू शकली नाही. कारण कोल्हेंनी ही निवडणूक मधेच सोडून दिल्याची चर्चा होती. तिला निकालाने दुजोरा मिळाला. हीच बाब नगर तालुक्यातही घडली. शिवसेनेची यावेळी एक जागा वाढली. शिवाय नगर तालुका पंचायत समितीवर पुन्हा वर्चस्व राहिले. 
 
राष्ट्रवादीला फटका 
गेल्यावेळीजिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ३१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर त्यांचीच सत्ता होती. यावेळी या जागा १८ वर आल्या. त्यात मोठा फटका गडाख यांनी पक्ष सोडण्याचा बसला आहे. कारण गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला नेवासे तालुक्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. अकोले तालुक्यात भाजपने मोठे खिंडार पाडत पिचड यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला आहे. 
 
पालकमंत्री निष्प्रभ 
पालकमंत्रीराम शिंदे यांची ‘फोर्टी प्लस’ची घोषणेची परिणती ‘जेमतेम फोर्टिन’पर्यंतच झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड झाल्या. त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील सहा पैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे गेल्या, यावरून काय ते स्पष्ट व्हावे. पालकमंत्र्यांनी आपली ताकद वापरून त्या भाजपकडे खेचून आणणे अपेक्षित होते. ते होऊ शकले नाही. आपल्याच गटातील लोकांना उमेदवारी देण्याचे त्यांचे धोरण अंगलट आले. हर्षदा काकडे यांना त्यांनी उमेदवारी नाकारली, पण त्या पक्षाच्या नाकावर टिच्चून निवडून आल्या आहेत. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पक्षीय बलाबल आणि प्रत्‍येक तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद आणि पंचायत समित्‍यांचा निकाल 

 
बातम्या आणखी आहेत...