आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-पुणे महामार्ग दिवसभर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव पाणीपुरवठा योजनेच्या (फेज 1) कामासाठी नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बुधवारी दिवसभर बायपास व सोनेवाडी रस्त्याने वळवण्यात आली होती. फेज 1 मधील महामार्गावरून जाणारी पाण्याची मेनलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजता काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

केडगाव पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाण्याच्या टाक्यांना जोडणारी मेनलाइन व अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम एस. एन. एन्टरप्राईजेस कंपनीला देण्यात आले आहे. आतापर्यंत 78 किलोमीटर लांबीच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नगर-पुणे महामार्गावरून जाणार्‍या व पाण्याच्या टाक्यांना जोडणार्‍या मेनलाइनचे काम अपूर्ण होते. हे काम बुधवारी सकाळी 9 पासून सुरू करण्यात आले. त्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सोनेवाडी रस्त्याने, तर पुण्याकडून येणारी वाहतूक बायपास रस्त्याने वळवण्यात आली होती.