आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahmednagar Aichitte Family To Brid Water Service

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयचित्ते कुटुंबाची पक्ष्यांसाठी पाणपोई!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक पाणवठे आटल्यामुळे घोटभर पाण्यासाठी पशू-पक्ष्यांवर रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. माणुसकीच्या नात्याने पक्ष्यांसाठी घराच्या आवारात दाणापाण्याची सोय करणारे विरळाच. सावेडी परिसरातील जयंत गणेश आयचित्ते (58) यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करून भूतदयेचे दर्शन घडवले आहे.
जयंत आयचित्ते हे नगर अर्बन बँकेतून सेवानिवृत्त झालेले पेन्शनर. सावेडीतील सहकारनगर परिसरातील मधुबन कॉलनीत त्यांचे घर आहे. पत्नी, मुलगा व एक नात (मुलीची मुलगी) असा त्यांचा परिवार आहे. माणसांसाठी पाणपोया बांधल्या जातात. परंतु आपल्या अवतीभवतीच्या पशुपक्ष्यांचे काय? या प्रश्नाने त्यांना सतावले. ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी ‘चला, बनुया पक्ष्यांचा आधार’ या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आयचित्ते यांच्या घरासमोरच्या आवारात बरीच झाडे आहेत. त्यामुळे तेथे पक्ष्यांचा राबता नित्याचाच. आयचित्ते यांनी एका झाडाखाली प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. या पाणपोईमधील पाणी पिण्यासाठी पक्षी येऊ लागले. गेल्या तीन महिन्यांपासून ही पाणपोई पक्ष्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. आयचित्ते व त्यांची लहानगी नात दिवसातून तीन वेळा या पाणपोईमधील पाणी बदलतात.
आयचित्ते यांच्या या उपक्रमाचे आता शेजार्‍यांनीही अनुकरण करायला सुरुवात केली आहे. मधुबन कॉलनीत आता घरोघर पक्ष्यांसाठी पाणपोया तयार झाल्या आहेत.