आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर: भुईकोट किल्ल्याबाबत लवकरच दिल्लीत बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहर जिल्हा काँग्रेस व भिंगार शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भुईकोट किल्ल्यात ऑगस्ट क्रांतिदिन साजरा करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी र्शद्धांजली वाहण्यात आली. किल्ल्याच्या सुशोभीकरणातील अडथळा दूर करण्यासाठी लवकरच नवी दिल्लीत बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व भिंगार अध्यक्ष आर. आर. पिल्ले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पिल्ले म्हणाले, भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. पण जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी किल्ल्याच्या प्रश्नाबाबत दिल्लीत संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, असे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी लवकरच दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षणमंत्र्यांची वेळ मागितली आहे, असे सारडा यांनी सांगितले.

पाकिस्तानने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधाचा ठराव अनंत देसाई यांनी मांडला. त्यास नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी अनुमोदन दिले. महिला काँग्रेसच्या नूतन शहराध्यक्ष छाया रोकडे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, रवींद्र कवडे, नलिनी गायकवाड, मार्गारेट जाधव, राजेश बाठिया, रावसाहेब चौधरी, अशोक त्रिभुवन, संजय सपकाळ, सुभाष त्रिमुखे, प्रभावती सत्रे, संजय छत्तीसे, ज्योती भंडारी, संजय झोडगे, सुनील भिंगारे, दिलीप सकट व प्रेमानंद पाडळे आदी यावेळी उपस्थित होते.