आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नगर शहराध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे नूतन शहराध्यक्ष फेब्रुवारी अखेर ठरणार असले तरी शहराध्यक्ष कोण होईल, याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेकजण इच्छुक असले तरी वर्णी कुणाची लागेल हे फेब्रुवारीअखेरीस समजणार आहे.

भाजपच्या स्थानिक पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष निवडीबाबत पहिली बैठक मंगळवारी निवडणूक निरीक्षक व माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहराध्यक्ष मिलिंद गंधे, उपमहापौर गीतांजली काळे, अभय आगरकर, वसंत लोढा, अनंत जोशी, अनिल गट्टाणी, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, प्रा. भानुदास बेरड, जगन्नाथ निंबाळकर,गौतम दीक्षित, सुवेंद्र गांधी, र्शीकांत साठे, नितीन शेलार, शिवाजी लोंढे, श्याम पिंपळे आदी उपस्थित होते. शहरातील प्रभाग समिती सदस्यांच्या निवडी लांबल्याने शहराध्यक्षपदाची निवडही लांबण्याची चिन्हे आहेत. बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल काही पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शहराध्यक्षपदासाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे पुन्हा या पदासाठी इच्छुक असले तरी काहींचा त्यांना विरोध असल्याने त्यांच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पदासाठी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र, सुनील रामदासी, वसंत लोढा, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाळके व जगन्नाथ निबांळकर इच्छुक आहे. त्यामुळे गंधे हेच की दुसरे कुणी शहराध्यक्ष होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.

त्यांना निवडीच्या वेळीच जाग येते
पक्षातील महत्त्वाच्या बैठकांसाठी निमंत्रणे देऊनही पदाधिकारी येत नाहीत. पक्षाच्या आंदोलनातही लोक सहभागी होत नाहीत. मात्र, शहराध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीला मात्र हे आवर्जून उपस्थित असतात. पक्षाच्या बैठकांना येण्यास त्यांना वेळ नाही. मात्र, पक्षविरोधात पत्रके काढण्यासाठी त्यांना वेळ असतो.शहराध्यक्षपदाची निवड पारदर्शकपणे होईल.
- मिलिंद गंधे, शहराध्यक्ष.

जिल्हाध्यक्षांनी फिरवली पाठ
स्थानिक पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी मंगळवारी वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हाध्यक्ष व आमदार प्रा. राम शिंदे यांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली.

दुसरी बैठकही पार पडली
पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीची पहिली बैठक मंगळवारी निवडणूक निरीक्षक प्रताप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुधवारी दुसरी बैठक झाली. यात निवडीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र, ठोस निर्णय झाला नाही.