आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahmednagar BJP District President Pratap Dhakane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रताप ढाकणे, मिलिंद गंधे यांचा पत्ता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे सर्मथक प्रताप ढाकणे यांची, तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर यांची निवड झाली. शहराध्यक्षपदाला मुदतवाढ मिळावी, यासाठी विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांचा पत्ता कट करण्यात आला.

जिल्हाध्यक्षपदाची घोषणा बुधवारी नागपूर येथे झाली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ढाकणे यांना नागपूरला बोलावून घेतले होते. चर्चा झाल्यानंतर त्यांनी ढाकणे यांना नियुक्तीचे पत्र दिले.केदारेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे व अँड. विवेक नाईक हे यावेळी उपस्थित होते.

भाजपची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया मागील चार महिन्यांपासूनच सुरू होती. जिल्ह्यातील 18 तालुका मंडल पदाधिकारी, शहराध्यक्ष व नंतर जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार होती. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जिल्हाध्यक्ष व खासदार मुंडे यांचे सर्मथक समजले जाणारे अँड. ढाकणे व माजी नगराध्यक्ष आगरकर यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. शहराध्यक्षपदासाठी खासदार दिलीप गांधी व ढाकणे यांच्या गटातील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांच्यासह जगन्नाथ निंबाळकर, अनिल गट्टाणी, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे हेही शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शहराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निरीक्षक ढाकणे यांनी दोन वेळा बैठका घेतल्या. मात्र, एकाही नावावर मतैक्य न झाल्यामुळे या बैठका केवळ चहापाण्यापुरत्याच ठरल्या. गंधे गेल्या तीन वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर होते. जिल्हा सरचिटणीस असलेले सुनील रामदासी यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली होती. ते यापूर्वी दोन वेळा शहराध्यक्ष होते. निंबाळकर इच्छुक असले, तरी त्यांना पक्षातूनच विरोध होता. पक्षातील जुने व निष्ठावंत कार्यकर्ते गट्टाणी यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, मागील निवड लांबणीवर पडली होती. बुधवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील बैठकीत जिल्हाध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांची, तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.

संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार
प्रदेशाध्यक्ष फडणवीस, खासदार मुंडे व विरोधी पक्षनेते तावडे यांनी जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून आपल्यावर विश्वास टाकला आहे. आगामी काळ आव्हानात्मक असून या काळात निवडणुका होणार आहेत.निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे.
- प्रताप ढाकणे, नूतन जिल्हाध्यक्ष.

सर्वांना न्याय देणार
शहर जिल्हाध्यक्षपदी पक्षर्शेष्ठींनी केलेली निवड आपण सार्थ ठरवणार आहोत. शहरात संघटनात्मक पक्षबांधणीसाठी आपण प्रयत्न करणार असून सर्वांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

कार्यालयात शुकशुकाट
जिल्हाध्यक्षपदी ढाकणे यांची निवड होताच पाथर्डीत ढाकणे सर्मथकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मात्र, शहर जिल्हाध्यक्षपदी आगरकर यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या नगर शहरातील गांधी मैदानातील कार्यालयाला मात्र कुलूप होते.

महापालिका निवडणुकीसाठी समिती
नूतन शहराध्यक्ष आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील शहर भाजप कार्यकारिणी हीच शहर जिल्ह्याची कार्यकारिणी असणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक समिती घोषित करण्यात आली असून या समितीत प्रदेश सरचिटणीस आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष ढाकणे, खासदार गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व आगरकर यांचा समावेश आहे.