आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

29 लाखांच्या सिमेंटची परस्पर केली विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गोदामात ठेवण्यासाठी दिलेले सिमेंट विकून ठाणगे ट्रान्सपोर्टची फसवणूक केल्याप्रकरणी बारा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

भरत नामदेव ठाणगे (ठाणगे मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल कांबळे, नीलेश कवाडे, बबन पंडित, सूर्यभान पंडित, रावसाहेब पंडित, राजू कवाडे, मोहन पंडित, नाथा पंडित (सर्वजण राहणार मेहकरी, ता. नगर), भाऊसाहेब कवाडे, उत्तम बारादरे, संजय घंटे व तुकाराम जाधव (सर्वजण राहणार खांडगाव, ता. नगर) या बारा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून जेके कंपनीचे सिमेंट मागवून त्यांनी ते औरंगाबाद रस्त्याजवळील गजराजनगरमध्ये असलेल्या गोदामात ठेवले होते. 1 जानेवारी ते 5 फेब्रुवारीदरम्यान कंपनीकडून आलेल्या 9 हजार 760 गोण्यांची गोदामातील व्यवस्थापक, कर्मचारी व हमालांनी परस्पर विक्री केली. 29 लाख 28 हजार किमतीचे सिमेंट परस्पर विकून फसवणूक करण्यात आली.