आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगप्रकरणी पाच वर्षे शिक्षा; कुशिनाथ कवडे दोषी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: विवाहितेला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी कुशिनाथ ऊर्फ कृष्णा पांडुरंग कवडे (45, राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वानखडे यांनी भादवी कलम 366 अन्वये 5 वर्षे, तर कलम 354 अन्वये एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला.
कवडे व त्याची पत्नी राधाबाईने रस्तापूर येथील एका महिलेस ‘तुला मूलबाळ होत नाही. त्यामुळे तुला पुणतांब्याला जाऊन आंघोळ करावी लागेल,’ असे सांगून तिला लॉजवर नेऊन बेशुध्द करून अत्याचार केला. त्या महिलेने याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नंतर हा गुन्हा राहुरी ठाण्यात वर्ग करण्यात आला.
तपास पोलिस उपनिरीक्षक आर. ए. मानगावकर यांनी केला. नंतर हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. अत्याचारित महिलेचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. साक्षीदारांचा पुरावा, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकील गोरख मुसळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कुशिनाथ कवडे यास शिक्षा ठोठावली. या खटल्यात अँड. परिमल फळे यांनी साहाय्य केले. आरोपीच्या पत्नीस संशयाचा फायदा देऊन निदरेष मुक्त करण्यात आले. अत्याचारित विवाहितेस दीड हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. या खटल्याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते.