आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत प्रभारीराज; जिह्यांत बदल्यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी केलेल्या अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यानंतरही स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखेत प्रभारीराज कायम आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शाखांसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. वादग्रस्त पोलिस निरीक्षक अभिमन पवार यांची मात्र उचलबांगडी करण्यात आली. तेरा पोलिस निरीक्षकांसह सहा सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेत गेल्या दीड वर्षापासून प्रभारीराज सुरू आहे. या शाखेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्वचिन्ह निर्माण करणार्‍या घटना शहर व जिल्ह्यांत घडल्या आहेत. अधीक्षक शिंदे येण्यापूर्वी निरीक्षक प्रदीप उगले यांची या शाखेचे प्रभारी म्हणून वर्णी लागली. सहा महिन्यांपूर्वी अचानक त्यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सहायक निरीक्षक प्रदीप उगले यांची नियुक्ती झाली.

स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त होण्याची अपेक्षा होती. मात्र, अधीक्षक शिंदे यांनी 24 ला रात्री केलेल्या बदल्यांमध्ये ही अपेक्षा फोल ठरली. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखोतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबतही असाच अनुभव आला. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी या शाखेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. मात्र, वादग्रस्त कर्मचारी कायम ठेवण्यात आले. निकष पाहूनच या शाखेत कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

गृहशाखेच्या प्रभारी उपअधीक्षक पदावरुन विजय पवार यांची तोफखाना ठाण्यात बदली झाली. वादग्रस्त निरीक्षक अभिमन पवार यांची कोतवालीतून कर्जतला बदली झाली. निरीक्षक बाळकृष्ण हनगुडे यांची नियंत्रण कक्षातून कोतवाली ठाण्यात बदली करण्यात आली आहे. निरीक्षक अशोक ढेकणे यांची तोफखान्यातून पोलिस कल्याण विभागात बदली झाली आहे. पोलिस कल्याण विभागातील निरीक्षक सुरेश गायधनी यांची र्शीगोंदे ठाण्यात बदली झाली आहे.