आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरविकासासाठी ‘बिल्डमॅट’ मैलाचा दगड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: नगर शहर मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. औरंगाबाद, नांदेडप्रमाणे नगरचा औद्योगिक विकास झालेला नाही. शहराचा विकास गतिमान होण्यासाठी बिल्डमॅट प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी शुक्रवारी केले.
आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनतर्फे न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या ‘बिल्डमॅट 2012’ च्या उद्घाटन प्रसंगी निमसे बोलत होते. डॉ. शरद कोलते, जी. डी. खानदेशे, र्शीगोपाल धूत, प्रकाश गांधी, असोसिएशनचे अध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्ष इकबाल सय्यद, समन्वयक जवाहर मुथा, राजेश उपाध्ये, अनिता रनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी शहरात केंद्राची उभारणी करायला हवी. शहराच्या प्रगतीसाठी उद्योजकांनी दबाव गट निर्माण करावा, असे सांगून ‘यू हॅव टू ग्रो ग्लोबली’ असा कानमंत्रही डॉ. निमसे यांनी दिला.

प्रा. शरद कोलते म्हणाले, ग्राहक वितरक व उत्पादकांना एकत्र आणण्याचा बिल्डमॅटचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रास्ताविक करताना अशोक काळे म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आता वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील उत्पादकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, म्हणून आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 13 मशिनरी उत्पादकांसह कॉसमॉस, तेजस, पारस आदी नामांकित कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे. रवींद्र जाजू, जी. डी. खानदेशे, अरतुसो वरगास यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन आर्किटेक्ट कविता जैन यांनी केले, तर आभार सचिव विजयकुमार पादीर यांनी मानले.
हे प्रदर्शन 24 जानेवारीपर्यंत चालणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. शनिवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत भूकंपविरोधी घरबांधणी या विषयावर अभय खानदेशे यांचे व्याख्यान होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ‘झूम बराबर झूम’ ही विनोदी नाट्यकृती सादर होईल. प्रदर्शन सकाळी 10 ते दुपारी व सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळात सुरू असेल.