आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला कॅबिनेट पद मिळण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री राम शिंदे यांना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेटमंत्रिपदी बढती मिळणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. तसे सूचक वक्तव्यही शिंदे यांनी जामखेड येथे रविवारी (१५ नोव्हेंबर) संत नामदेव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केले. महिनाअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होऊन वर्ष उलटले. कधी नव्हे ते भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे मंत्रिमंडळात जिल्ह्याला उचित स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, केवळ एका राज्यमंत्रिपदावर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. महायुती सरकारने जिल्ह्याचे राजकीय महत्त्व कमी केल्याची भावना कार्यकर्ते नागरिकांत त्यामुळे निर्माण झाली. आघाडी सरकार तत्पूर्वीच्या युती सरकारच्या कालावधीतही जिल्ह्यात किमान कॅबिनेट मंत्रिपदे निश्चित होती. परिणामी जिल्ह्यातील कार्यकर्ते नागरिकांच्या कामांत सुलभता यायची. भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनवूनही मंत्रिपद देताना पक्षाने जिल्ह्यावर अन्याय केल्याचे चित्र वर्षभरापासून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिनाअखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे जाहीर केल्याने जिल्ह्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिंदे यांना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जामखेड येथील कविता उत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी इंग्लंड वारीचा उल्लेख करत पाणी बदलणे चांगले असते, असे सांगत लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य करून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झाल्याचे संकेत दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बळ वाढवण्यासाठी पक्षाला जिल्ह्यात सक्षम चेहऱ्याची आवश्यकता आहे. जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेली कामगिरी, विधानसभेतील त्यांची पाचवी टर्म लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. यातून पक्षाला जिल्ह्यात बळकटी मिळण्यात मदत होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच कर्डिले यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. यावेळीही त्यांच्या नावाची चर्चा आहे.

... त्यामुळेच गेले पाणी
जिल्ह्याचेराजकीय वजन कमी झाल्यानेच ऐन दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्याला पाणी देण्याची वेळ जिल्ह्यावर आली. कुकडीचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठीही झगडावे लागत आहे. मराठवाडा नाशिकमधील मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी एकदिलाने पाण्यासाठी लढताना नगर जिल्ह्यातील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. परिणामी जिल्ह्यातील लाभक्षेत्र कोरडे ठेवून पाणी द्यावे लागले. पालकमंत्री शिंदे यांनीही यासंदर्भात जिल्ह्याची बाजू घेतल्याचे चित्र लाभक्षेत्राला दिसले नाही.

दोन मंत्रिपदांची मागणी
मंत्रिमंडळविस्तारात जिल्ह्याला एक कॅबिनेट एक राज्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली आहे. मागणीनुसार दोन मंत्रिपदे मिळतील, अशी अपेक्षा आहे. पदे कोणाला द्यावीत याचा निर्णय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षच घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ महामंडळ पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही अपेक्षित आहे. नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे अर्ज त्यासाठी प्रदेश समितीकडे पाठवण्यात आले आहेत. '' प्रा.भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष,भाजप.