आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर तालुक्यात नेत्यांची गावेच अतिसंवेदनशील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) मतदान होत आहे. तालुक्यात ५७ पैकी गावे अतिसंवेदनशील, तर १३ गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अतिसंवेदनशील संवेदनशील गावे ही बहुतांशी तालुकास्तरावरील पुढाऱ्यांचीच आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांपैकी पाच सदस्य, भाजप जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापतींच्या गावांचा यात समावेश आहे.

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ५७ ग्रामपंचायतींसाठी तालुक्यात २०६ बूथ लावले जाणार आहेत. या २०६ बूथसाठी एक हजार ३० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. २०६ बूथवर प्रत्येकी एक या प्रमाणे २०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील नगर तालुका एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून फक्त ४७ कर्मचारी निवडणूक प्रशासनाला मिळाल्याने बाहेरून पोलिस कर्मचारी मागवून घेत त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तालुक्यामध्ये अतिसंवेदनशील, तर १३ संवेदनशील गावे आहेत. या गावांमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांचे बुऱ्हाणनगर, जिल्हा परिषद सदस्य कालिंदी लामखडे यांचे निंबळक, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचे गुंडेगाव, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सदाफुले यांचे चिचोंडी पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंदा गायकवाड यांचे देहरे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे यांचे जेऊर, पंचायत समिती सभापती संदेश कार्ले यांचे खंडाळा, बाजार समितीचे संचालक दत्ता सप्रे यांचे नवनागापूर, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचे दरेवाडी या प्रमुख नेत्यांच्या गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये प्लस असा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. निवडणूक प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारी दुपारनंतर त्या-त्या बूथवर पोहच करण्यात आले. नगर तालुक्याचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी सोमवारी आपल्या पथकासह गावोगावी भेट देत निवडणूक पूर्व कार्याची पाहणी केली. नगर तहसीलमध्ये निवडणुकीसाठी म्हणून खास आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या नियंत्रणाखाली या कक्षाचे काम सुरू आहे. नगर तालुक्यात ११ महसूल मंडलांमध्ये मंडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ११ पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय तालुक्यात एक भरारी पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे.

आज मतदान
तालुक्यातील५७ गावांमध्ये मंगळवारी (४ ऑगस्ट) मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी नेते कार्यकर्ते भर देत आहेत.
अतिसंवेदनशील संवेदनशील गावे
नगरतालुक्यातील ५७ पैकी निंबळक, उदरमल ही गावे अतिसंवेदनशील, तर इमामपूर, जेऊर, नवनागापूर, देहरे, बुऱ्हाणनगर, दरेवाडी, वडारवाडी, चिचोंडी पाटील, रूईछत्तीसी, गुंडेगाव, खंडाळा, कामरगाव, बुरूडगाव ही गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.