आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Drainage Cleaning Issue Public Harass

अहमदनगर शहरात नालेसफाईचा केवळ देखावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील नालेसफाईचे काम 70 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला असला, तरी नालेसफाई झालीच नसल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची विल्हेवाट न लावता तो नाल्यांच्या कडेलाच टाकण्यात आला आहे. पाऊस पडला की हा गाळ पुन्हा नाल्यात जाणार आहे.

मनपाने यावर्षी नालेसफाईचे काम उशिरा सुरू केले. गेल्या वर्षी या कामाच्या निविदांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. यावर्षी फेरनिविदांमध्ये प्राप्त झालेल्या दोनपैकी एक निविदा निश्चित करून 27 मे रोजी सीना नदीपात्रापासून सफाईला सुरुवात करण्यात आली.

शहरात ओढय़ानाल्यांची संख्या सुमारे 22 आहे. त्यांची सफाई करण्यासाठी 25 ते 30 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने नालेसफाईचे काम मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे आवश्यक होते. काम उशिरा सुरू झाल्याने ते घाईत करण्यात येत आहे. दोन जेसीबी, पाच पोकलेन मशीन व 20 कर्मचार्‍यांमार्फत हे काम सुरू आहे. मात्र, नाल्यातून उपसलेल्या गाळाची योग्य विल्हेवाट न लावता तो शेजारीच टाकण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी नाल्यांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे जेसीबी व पोकलेन मशीनने सफाई करणे कठीण झाले आहे. आतापर्यंत नालेसफाईचे 70 टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा मनपाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. मात्र, नालेसफाई झालीच नसल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे.