आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या अपहरण प्रकरणी तपासाला गती; सूत्रे ज्योतिप्रिया सिंग यांच्याकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तरूणीचे अपहरण करून तिला कुंटणखान्यात वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणाच्या तपासाला सहायक पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी गती दिली आहे. पीडित युवती व तिच्या भावी पतीला नगरला आणून कथित घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली असून अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाच्या चालकाकडेही चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास मंगळवारी (15 जानेवारी) सिंग यांच्याकडे सोपवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप उगले त्यांना साहाय्य करीत आहेत. ही युवती व तिच्या भावी पतीला बुधवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्याही समवेत होत्या. सिंग यांनी घटनाक्रमाची पडताळणी केली. सायंकाळी संबंधित युवतीला घेऊन सिंग यांनी अपहरण घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. बिगबाजारच्या थोडेसे पुढे कीर्ती हॉटेलसमोर अपहरणाचा प्रकार घडल्याचे या युवतीने दाखवले.

दरम्यान, अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इंडिका व्हिस्टाच्या चालकाला शिरपूरहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडेही चौकशी सुरू असून पीडित युवती, तिचा भावी पती व या चालकाच्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळली आहे. अपहरण झालेच नसल्याचा खुलासा या चालकाच्या चौकशीतून पुढे आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.