आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Kolhara Aggressive Agitator For Tolabanda

नगर-कोल्हार टोलबंदसाठी आंदोलक आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-कोल्हार राज्यमार्गावरील टोलवसुली बंद करण्याच्या मागणीसाठी अधीक्षक अभियंता हरीष पाटील यांच्या दालनासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उपोषण केले. ठोस आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचे आंदोलकांनी अधिकार्‍यांना ठणकावल्याने रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.
सुप्रिमो इन्फ्रास्ट्रर या ठेकेदाराने कोल्हारपर्यंत चौपदरीकरण केले आहे. निविदा कलमानुसार कामे पूर्ण न करताच ठेकेदार टोलवसुली करत आहे. नोव्हेंबरमध्ये अधीक्षक अभियंता कार्यालयाने नाशिकला टोलवसुली बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला. जानेवारीअखेर हा प्रस्ताव शासनस्तरावर गेला. मात्र, अपूर्ण कामे पूर्ण करेपर्यंत टोल बंद करायला शासन तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस अभिजित खोसे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. शुक्रवारी नाशिकला मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत तोडगा निघणार असल्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. भूपेंद्र परदेशी, मुख्तार देशमुख, मोहन गुंजाळ, नीलेश बांगरे, सुरेश बनसोडे, राजेंद्र देवळालीकर, अर्चना देवळालीकर, अंकुश चव्हाण, राहुल जाधव उपोषणात सहभागी झाले आहेत.