आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या बलिदानामुळे मराठा समाज एकत्र आला, म्हणून मंदिर उभारणार - कोपर्डीतील पीडितेची आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर/पुणे/जळगाव/नाशिक - राज्याला हादरवणाऱ्या व मराठा समाजाला संघटित करणाऱ्या कोपर्डी प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष झाले. निर्भयाच्या स्मृतिदिनी राज्यभरातून लोकांनी कोपर्डीत येऊन श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पीडितेचा प्रतिकात्मक पुतळा बुधवारी मध्यरात्री नाशिकहून हलविण्यात आल्याची बातमी अगोदर आली. मात्र, गुरुवारी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर गावातील गर्दी ओसरताच रात्री साडेदहाच्या सुमारास  कुटुंबीय व काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुतळा नियोजित ठिकाणी बसवण्यात आला.
 
निर्भयाचे मंदिर उभारणार
कोपर्डीत निर्भयाचे मंदिर उभारणार असल्याचे सांगून पीडितेची आई म्हणाली की, हे मंदिर सध्या जेथे चबुतरा आहे, त्याच्या बाजूलाच कॉलम उभे करून उभारले जाणार आहे. माझ्या मुलीच्या बलिदानामुळे संपूर्ण देशातील मराठा समाज एकत्र आला, त्यामुळे हे मंदिर उभारत असल्याचे त्यांनी सांगितले.
तेथे उपस्थित बहुसंख्य ग्रामस्थांनीही याला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, पत्रकार पीडितेचा पुतळा असलेल्या चबुतऱ्याच्या जागी जाताच तो झाकण्यात आला. 
 
पीडितेच्या पुतळ्याच्या वादावर तिची आई म्हणाली, ‘गेले वर्षभर आम्हाला सर्वांनी मदत केली, परंतु भय्यू महाराजांनी सर्वतोपरी मदत केली. मात्र, काही लोकांनी विरोध केला म्हणून आज आमच्या मुलीच्या वर्षश्राद्धाला ते येऊ शकले नाहीत. माझे लोकांना एवढेच सांगणे आहे, राजकारण करू नका. तिचा जीव गेल्यावर, काही लोकच आम्हाला म्हणत होते, तिच्या नावाने काहीतरी उभे करा, त्यानुसार हे समाधीस्थळ उभारले जात आहे. त्यावरही राजकारण झाल्याचं 
दु:ख वाटतंय.’
 
पीडितेची आई..
लोकच म्हणत होते मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ नावाने काहीतरी उभे करा. त्यानुसार आम्ही हे समाधिस्थळ उभारत होतो, त्यावरही राजकारण झालं याचं दु:ख वाटतंय.’ 
- पीडितेची आई, कोपर्डी येथे निर्भयाच्या पहिल्या स्मृतिदिनी बोलताना

पुढील स्लाइडवर वाचा...
>कोपर्डीत राताेरात उभारलेला पुतळा दुसऱ्या दिवशी झाकला
>निर्भयाला श्रद्धांजली; मुंबईत मूकमाेर्चा काढण्याचा निर्धार
>पीडितेच्या स्मारकावरून राजकारण नको- सुप्रिया सुळे
>भय्यू महाराजांच्या पुतळ्याचे दहन
> चिमुकलीवर नराधमांकडून पाशवी बलात्कार...
बातम्या आणखी आहेत...